करमाळा पोलीसांची मोठी कामगिरी — घरफोडीतील सोन्याचे दागिने हस्तगत!
दि. २ जुलै २०२५ | करमाळा
करमाळा पोलिसांनी दिवसा घरफोडी प्रकरणातील आरोपीला अटक करत सुमारे ९ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.
दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी अभिजीत जीवन सरडे (वय २७, रा. कंदर, ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली होती की, दुपारी १२ ते २.३० दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराची कडी उचकटून घरफोडी केली. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७८८/२०२४, भा.दं.वि. कलम 454, 457, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान रामेश्वर जंगल्या भोसले (वय २५, रा. पांडेगव्हाण, ता. आष्टी, जि. बीड) याला अटक करण्यात आली. न्यायालयीन कोठडी घेऊन त्याच्याकडून ९.५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे कर्णफुले व सोन्याची दुही असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
आरोपीवर याआधी खालील ठिकाणी गुन्हे दाखल आहेत:
1. करमाळा – गु.र. ७८८/२०२४
2. कर्जत – गु.र. ७७५/२०२४, ६७४/२०२४, ३६०/२०२१
3. गंगापूर – गु.र. ४२५/२०१९
4. बीडकीन – गु.र. ८९/२०१९
5. राहुरी – गु.र. ६९२/२०१६
6. आष्टी – गु.र. १८६/२०१९
ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी (सोलापूर ग्रामीण), अपर पोलीस अधीक्षक श्री. प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक रणजीत माने, सहाय्यक निरीक्षक गीरीजा म्हस्के, पो.उ.नि. प्रशांत मदने, तसेच पोलीस कर्मचारी — अजीत उबाळे, वैभव ठैंगल, मनिष पवार, सोमनाथ गावडे, योगेश येवले, मिलिंद दहिहांडे, अर्जुन गोसावी, अमोल रंदिल, रविराज गटकुळ आदींनी सहभाग घेतला.
अंगुलीमुद्रा विभागाचे स.पो.नि. गळवे आणि सायबर पोलीस ठाण्याचे पो.शि. व्यंकटेश मोरे यांनी तांत्रिक मदत केली.
🟠

सूचना / Disclaimer:
या पोर्टलवरील सर्व बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि मजकूर हे केवळ माहिती व जनहितासाठी प्रसारित केले जातात. आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे किंवा अफवा पसरवणे हा नाही. कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी आम्ही ती सत्य व खात्रीशीर असल्याची पुष्टी करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.