Homeताज्या बातम्याखडक पोलीस स्टेशनची धडक कारवाई; ४८ तासात कौशल्यपूर्ण तपास करून बुलेट चोरास...

खडक पोलीस स्टेशनची धडक कारवाई; ४८ तासात कौशल्यपूर्ण तपास करून बुलेट चोरास केले जेरबंद

​पुणे शहर (दि. ३० सप्टेंबर २०२६):
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या खडक पोलीस स्टेशन हद्दीतून बुलेट दुचाकी चोरी करणाऱ्या अट्टल चोराला पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे अवघ्या ४८ तासांत शोधून जेरबंद केले आहे. आरोपीकडून चोरीला गेलेली ३०,०००/- रुपये किमतीची बुलेट दुचाकी यशस्वीरित्या जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे शहर पोलीस जनसंपर्क अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या प्रेसनोटमध्ये नमूद करण्यात आली आहे.
​गुन्ह्याची पार्श्वभूमी:
​दिनांक १९/०९/२०२६ रोजी खडक पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी यांनी तक्रार दिली होती की, दिनांक १३/०९/२०२६ रोजी रात्री २१:३० वाजता ते २३:३० वाजण्याच्या सुमारास मोहन मेटल वर्क्स, भवरी आळी, रविवार पेठ, पुणे येथील सार्वजनिक रस्त्याच्या लगत लॉक करून पार्क केलेली त्यांची बुलेट दुचाकी अज्ञात इसमाने चोरी केली होती. या प्रकरणी खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. ५१२/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास खडक पोलीस स्टेशनकडील तपास पथक करीत होते.
​तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा शोध:
​दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस स्टेशन हद्दीमधील तसेच आजूबाजूच्या परिसरातील १०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची कसून पाहणी करण्यात आली. तसेच आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेण्यात येत असताना, तपास पथकातील पोलीस अंमलदार मयुर भोसले व उमेश मठपती यांना त्यांच्या बातमीदारामार्फत मिळाली बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा शुभम पोतदार याने केला आहे.
​मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी उंड्री या भागात जाऊन शोध घेतला असता आरोपी मिळून आला. त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव शुभम अशोक पोतदार (वय २९ वर्षे, रा. येळवी, मारुती मंदिराजवळ, ता. जत, जि. सांगली) असल्याचे सांगितले.
​अटक व मुद्देमाल जप्त:
​त्याच्याकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने कसून चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. यावरून त्यास दाखल गुन्ह्यात दि. २३/०९/२०२६ रोजी अटक करण्यात आली. पोलीस अटकेत असताना त्याने दाखल गुन्ह्यातील चोरी केलेली ३०,०००/- रुपये किमतीची बुलेट दुचाकी पोलिसांकडे सादर केली, जी जप्त करण्यात आली आहे.
​पोलीस पथकाचे मार्गदर्शक व अधिकारी:
​सदरची उत्कृष्ट कामगिरी खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनच्या पथकाने केली आहे:
​मार्गदर्शन अधिकारी:
​मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. राजेश बनसोडे
​मा. पोलीस उप आयुक्त, परि-१, श्री. कृषिकेश रावले
​मा. सह पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, श्री. सचिन हिरे
​तपास पथक व अधिकारी:
​वरिष्ठ पोलीस निरीक्षक: श्री. धंजनय पिंगळे
​पोलीस निरीक्षक (गुन्हे): श्रीमती शर्मिला सुतार
​पोलीस निरीक्षक (गुन्हे): श्री. समाधान पवार
​सहायक पोलीस निरीक्षक: प्रसन्न जहाड
​पोलीस उप निरीक्षक: महेंद्र कांबळे, राहुल मखरे
​सहायक पोलीस उप निरीक्षक: विनोद शिंदे
​पोलीस अंमलदार: मयुर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, निलेश साबळे, उमेश मठपती, सैपुनमुलुख नदाफ, विकास पांडोळे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बनावट खाती (म्युअल अकाऊंट) उघडून १ कोटी ८० लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ५...

​पुणे: महाराष्ट्र सायबर मुंबई यांचेकडून मनी ट्रेल, म्युअल बँक अकाऊंट तसेच चेक एटीएम विड्रालच्या फसवणुकीच्या तक्रारींची डेटा माहिती प्राप्त झाल्यामुळे, वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

. दुःखाच्या प्रसंगी धावली ‘रुग्ण हक्क संघर्ष समिती’; मोशीतील मृत महिलेचे संपूर्ण हॉस्पिटल बिल...

पुणे/पिंपरी-चिंचवड: मोशी येथील धनश्री हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मयत झालेल्या प्रतिभा बळीराम बोतकूलवार यांच्या कुटुंबीयांना 'रुग्ण हक्क संघर्ष समिती'च्या तत्पर मध्यस्थीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. हॉस्पिटल प्रशासनाने...

लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त शिवसेना प्रभाग क्रमांक २७च्या वतीने अभिवादन

पुणे : भारताचे माजी पंतप्रधान आणि स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना प्रभाग क्रमांक २७च्या वतीने त्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात...

वानवडीत रिक्षाला धडक देऊन अल्पवयीन शाळकरी मुलींसह रिक्षाचालकाला जखमी करणाऱ्या कारचालकावर गुन्हा दाखल

पुणे: पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रॉन्ग साईडने भरधाव वेगात येऊन शाळकरी मुलींच्या रिक्षाला धडक देणाऱ्या चारचाकी वाहनाविरोधात वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या...

error: Content is protected !!