लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा अकरावा स्मृतिदिन आज विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला. या निमित्ताने गोपीनाथ गडावर अनेक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगानेच आज गोपीनाथगडावर आज गोमातेची अनोखी भेट भाजपा शहराध्यक्षा उमाताई समशेट्टी यांनी मला दिली. या गोमातेचा सांभाळ करण्याची जबाबदारी गोपीनाथ गडाने घेतली आहे.
गोपीनाथ गडावर तीन शक्तीपिठांचे एकत्र मंदिरही आहे. याठिकाणी गोमाता असावी या भावनेपोटी समशेट्टी परिवाराने यांनी एक गोंडस गोमाता (कालवड) गोपीनाथगडाला भेट देण्याचा निर्णय घेतला. यावेळी नितीन समशेट्टी, आश्विन मोगरकर, प्रितेश तोतला, अनिश अग्रवाल, राहूल घोबाळे आदी उपस्थित होते.

सूचना / Disclaimer:
या पोर्टलवरील सर्व बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि मजकूर हे केवळ माहिती व जनहितासाठी प्रसारित केले जातात. आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे किंवा अफवा पसरवणे हा नाही. कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी आम्ही ती सत्य व खात्रीशीर असल्याची पुष्टी करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.