उपमुख्यमंत्री पवार यांची मा. मंत्री तनपुरे यांना प्रवेशाची ऑफर
सहसंपादक शिवाजी दवणे क्राईम महाराष्ट्र न्यूज 9730170965
राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना राष्ट्रवादी पक्षात येण्याची ऑफर दिली असल्याचे दिसून आले. यानंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे काय निर्णय घेणार किंवा त्यांच्या मनात काय आहे हे मात्र समजू शकले नाही.
उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज दि. २७ जुलै २०२५ रोजी सकाळी राहुरी येथील बाजार समिती येथे शेतकरी भवन व उपहार गृहाचा उद्घाटन सोहळा तसेच कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. त्यानंतर अजित पवार यांना बाजार समितीचे सभापती अरुण तनपूरे यांच्या घरी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी कौटुंबिक विषयावर चर्चा केली. त्यावेळी सभापती अरुण तनपूरे यांच्या घरात उप मुख्यमंत्री अजित पवार, सभापती अरुण तनपूरे, कारखान्याचे संचालक हर्ष तनपूरे तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा एकत्रित मोठा फोटो घरातील भिंतीवर लावलेला पाहीला. यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे अजित पवार यांच्या शेजारीच बसलेले होते. गप्पा मारता मारता भिंतीवर लावलेल्या त्या फोटोकडे अजित पवार यांचे लक्ष गेले. त्यावेळी ते म्हणाले कि, या फोटोत सुनिल तटकरे ऐवजी प्राजक्त तनपुरे पाहिजे होते. त्यावेळी मोठा हशा होऊन अजित पवार यांनी एक प्रकारे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना राष्ट्रवादीत प्रवेशाची ऑफर दिली काय? असा प्रश्न उपस्थितांच्या चेहर्यावर दिसून आला.
यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना विचारले असता त्यांनी सांगीतले कि, राज्याचे उप मुख्यमंत्री माझ्या घरी आल्यानंतर मी त्यांचा पाहूनचार करणे ही मराठी संस्कृती आहे. कुठल्याही राजकीय भूमिके बाबत माझा विचार नसल्याचे यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी सांगीतले.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833




















