नवीन पायऱ्या चा स्लॅब कोसळून परप्रांतीय मजूर ठार
सहसंपादक शिवाजी दवणे क्राईम महाराष्ट्र न्यूज 9730170965
राहुरीतालुक्यातील कृषी विद्यापीठ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे काम सुरु आहे. त्या ठिकाणी पायरीसाठी टाकलेला नवीन स्लॅब कोसळून एक पर प्रांतीय मजूर जागीच ठार झाल्याची घटना आज दि. २६ जुलै रोजी विद्यापीठ येथे घडली.
राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे गेल्या तीन वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे काम चालु आहे. या कामासाठी वापरले जाणारे मटेरियल सिमेंट, गज, डस्ट हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे वापरले जात आहे. सदर बांधकाम जवळपास पूर्ण होत आले आहे. भवनामध्ये जाण्यासाठी सुमारे आठ फूट उंच पायऱ्या बनवीण्यासाठी काही दिवसापूर्वी स्लॅब टाकला होता. आज दि. २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजे दरम्यान विकासकुमार छेदीलाल, रा. फत्तेपूर, उत्तर प्रदेश हा कामगार पायरीच्या स्लॅब खालील प्लेटा खोलत असताना अचानक सर्वच्या सर्व पायऱ्या त्याच्या अंगावर पडल्या आणि तो गंभीर जखमी झाला. सचिन धसाळ यांनी त्यांच्या रुग्णावाहीकेतून जखमी कामगाराला अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात नेले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विकासकुमार छेदीलाल याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. घटने नंतर ठेकेदाराने ताबडतोब एक जेसीबी मशीन बोलावुन पडलेल्या पायऱ्यांचा ढिग साफ करून सदर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
सदर आंबेडकर भवनाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून सदर बांधकामाची पाहणी करून सखोल चौकशी करावी. तसेच विद्यापीठ प्रशासन व सदर बांधकाम ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. तसेच पुरावा नष्ट करणारा जेसीबी जप्त करून त्यावर कारवाई करावी. अशी मागणी सर्व सामान्य नागरिकांमधूून होत आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833




















