🔫 पिस्टल व जिवंत राऊंड बाळगणा-या गुन्हेगारास मुंढवा पोलीसांनी केली अटक
दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी रात्री ८.३० वा. च्या सुमारास मुंढवा पोलीस ठाण्याचे पोहवा २१८४ विनोद बाबुराव सांळुके यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हडपसर रेल्वे स्टेशनजवळ किर्तनेबाग परिसरात एक इसम सार्वजनिक ठिकाणी पिस्टल व जिवंत काडतुसासह थांबलेला आहे.
ही माहिती वरिष्ठांना कळवण्यात आली असता, तपास पथकाचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. राजू महानोर यांनी तत्काळ कृती करत, संबंधित ठिकाणी पोहचून संशयित इसमास ताब्यात घेतले. अंगझडतीमध्ये त्याच्याकडून १ पिस्टल व १ जिवंत राऊंड जप्त करण्यात आले.
याबाबत मुंढवा पोलीस ठाण्यात गु. र. क्र. २१३/२०२५ शस्त्र अधिनियम कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यात आरोपीचे नाव राहुल संजय देटके (वय २३, रा. म्हसोबा वस्ती, विजयनगर, लेन नं. ०२, मांजरी बुद्रक, पुणे) असे असून त्यास रात्री १०.३० वा. अटक करण्यात आली.
ही कामगिरी पुढील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार
मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा
मा. अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील
मा. पोलीस उपआयुक्त (परीमंडळ ५) श्री. राजकुमार शिदे
सहा. पोलीस आयुक्त श्रीमती अनुराधा उद्दमले
तपास पथक:
वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती माया देवरे,
पो. नि. (गुन्हे) श्री. बाबासाहेब निकम,
सहा. पोलीस निरीक्षक राजु महानोर,
पो. उपनि. युवराज पोमण,
सहा. पो. फौ. राजु कदम,
पो. हवालदार विनोद सांळुके, शिवाजी धांडे,
पो. अंमलदार अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर, रुपेश तोडेकर.
—
(माया देवरे)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833




















