लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबीर देवाच्या भव्य भंडाऱ्याचे आयोजन
सहसंपादक: शिवाजी दवणे, क्राईम महाराष्ट्र न्यूज – 9730170965
धनगरी भक्तांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केलेल्या बाबीर धुळेश्वर देवस्थान गोटुंबे आखाडा येथे यावर्षीही अत्यंत श्रद्धा, भक्ती व जल्लोषात भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, दिनांक 27 जुलै 2025 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
24 वर्षांची अखंड परंपरा लाभलेला हा भंडारा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साहात साजरा होत आहे.
कार्यक्रमाचे आयोजक रामदास खेमनर व बाबीर धुळेश्वर युवा मंच, गोटुंबे आखाडा हे आहेत.
> “सुंदरते खूप मोठी, त्यांची कीर्ती
त्यांच्या दर्शनासाठी होती भक्तांची गर्दी
सर्व भक्तांच्या हाकेला धावून येतो
मन प्रसन्न त्याला पाहून!!
बाबीर देवाच्या नावानं चांगभलं!!
धूळदेवाच्या नावानं चांगभलं!!”
बाबीर देव, ज्यांना बाबीर बुवा म्हणूनही ओळखले जाते, हे धनगर समाजाचे एक प्रमुख आराध्य दैवत असून त्यांना भगवान शंकराचे बारावे रूद्र रूप मानले जाते.
त्यांचे मुख्य स्थान रुई (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे असून, त्यांच्या जन्माची कथा येलुआई देवीच्या तपश्चर्येशी निगडित आहे.
या भंडाऱ्याच्या निमित्ताने परिसरातील भाविकांचा प्रचंड जनसागर उसळणार असून भक्ती, बंधुत्व आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडणार आहे.
सर्व भाविकांना आयोजकांकडून सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833




















