शिंगणापूर देवस्थानचे सीईओ नितीन शेटे यांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
सहसंपादक शिवाजी दवणे
क्राईम महाराष्ट्र न्यूज 9730170965
अहिल्यानगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध देवस्थान असलेल्या
शनिशिंगणापूरचे विश्वस्त नितीन शेटे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे खळबळ जनक घटना समोर आली आहे. नितीन शेटे यांनी सोमवारी सकाळी आठ वाजता त्यांच्या राहत्या घराच्या छताला दोर लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेमुळे शिंगणापूर मध्ये खळबळ उडाली आहे. नितीन शेटे हे सध्या शनिशिंगणापूर देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते. आज सकाळी त्यांनी आत्महत्या केल्यानंतर शनिशिंगणापूर मध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी त्यांचा मृत्यू देव खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या घटनेमुळे शनिशिंगणापूर परिसरात शोककळा पसरली आहे.
नितीन शेटे हे आमदार शंकराव गडाख यांचे खंदे समर्थक होते. महिनाभरापूर्वी 114 मुस्लिम कर्मचारी घेतल्यामुळे शनिशिंगणापूर विश्वस्त कर्मचारी बाबत प्रश्न निर्माण केला गेला होता. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना कामावरून काढ ण्यात आले होते. तसेच देवस्थानची बनावट ॲप तयार करून अपरातफर करण्यात आली होती. यानंतर राज्य सरकारकडून शिर्डी आणि पंढरपूर च्या धरतीवर शिंगणापूर मंदिर समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी पावसाळी अधिवेशन काळात ही माहिती सभागृहात दिली होती. आमदार विठ्ठलराव लंगे यांनी याविषयी सभागृहात लक्षवेधी काम केली होते.
या पार्श्वभूमीवर नितीन शेटे यांची आत्महत्या चर्चेचा विषय ठरत आहे. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदना साठी पाठविलेला आहे, आता येतो काय निष्पन्न होत आहे याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. मात्र त्यांच्या आत्महत्येचा आणि भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीचा काही संबंध असेल का❓ याविषयी सध्या तर्क वितर्क काढले जात आहे. पोलिसांनी अद्यापही या घटनेबाबत काही माहिती दिलेली नाही. त्यामुळे पुढील चौकशीत काय समोर येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833




















