Homeताज्या बातम्याअवैध गावठी दारू हातमडी उद्ध्वस्त; आरोपीस अटक, मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त

अवैध गावठी दारू हातमडी उद्ध्वस्त; आरोपीस अटक, मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त

पुणे | प्रतिनिधी
लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत अवैध गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत हातमडी उद्ध्वस्त केली असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात दारू व साहित्य जप्त करण्यात आले आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या ‘फ्लश आऊट ऑपरेशन’ अंतर्गत दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी पोलिस पथक गस्त घालत असताना पोलिस अंमलदार जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. मौजे हिंगणगाव, ता. हवेली, जि. पुणे येथील शेतकरी संतोष बाळासाहेब मुर्कुटे यांच्या शेताजवळील जंगल परिसरात एक इसम मोठ्या प्रमाणात गावठी दारू तयार करत असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक अर्जुन बेंडबुडे व त्यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यात पोलिसांनी आरोपी सचिन मकरसिंग नानावत (वय २७, रा. रामकृष्ण हरी मंगल कार्यालयाजवळ, राहू रोड, आष्टापुर फाटा, पुणे) याला रंगेहात पकडले.
कारवाईदरम्यान पोलिसांना विविध प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये आंबलेले रसायन, दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य तसेच अंदाजे १३,७०० लिटर कच्चे रसायन आणि ६५० लिटर तयार गावठी दारू असा मोठा साठा आढळून आला. यासोबतच हातमडीसाठी वापरण्यात येणारे लोखंडी ड्रम, प्लास्टिक टाक्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले. एकूण मुद्देमालाची किंमत अंदाजे १३ लाख १२ हजार ५०० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी लोणीकंद पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अर्जुन बेंडबुडे करत आहेत.
ही कारवाई पोलिस उपआयुक्त, परिमंडळ ७ यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या सूचनांनुसार पार पडली. कारवाईत पोलिस कर्मचारी स्वप्नील जाधव, कैलास साळुंखे, सागर जगताप, संतोष अंडुरे, मल्हारी सुपे, शुभम चिंके, सुधीर शिंदे व दिनेश मरकड यांनी सहभाग घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असून नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला निश्चित केले: पोलिसांनी उघड केले की...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

error: Content is protected !!