अहिल्यानगर जिल्हा परिषद चे तालुका निहाय आरक्षण
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज
सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965
राहुरी पंचायत समिती निवडणुकीसाठी गणनिहाय आरक्षण सोडत आज सोमवार दि. १३ ऑक्टोबर रोजी राहुरी येथील तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आली. तसेच आज अहिल्यानगर येथे जिल्हा परिषद गटाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या पंचायत समिती गणनिहाय आरक्षण सोडत आज दि. १३ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आली. यावेळी उप जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा राशिनकर यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले तर तहसीलदार नामदेव पाटील व नायब तहसीलदार संध्या दळवी यांनी सोडत प्रक्रिया राबवली. प्रसंगी लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून १० गणांची सोडत काढण्यात आली. यामध्ये ब्राह्मणी, गुहा, कोल्हार खुर्द गणात- सर्वसाधारण महिला आरक्षण. सात्रळ, टाकळीमिया गणात- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण. वांबोरी, उंबरे व मानोरी गणात- सर्वसाधारण व्यक्ती आरक्षण. बारागाव नांदूर- अनुसूचित जमाती महिला, डिग्रस- अनुसूचित जाती व्यक्तीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. शांततेत व मोठ्या उत्साहात आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण झाली.
यावेळी नंदुभाऊ डोळस, सचिन म्हसे, ज्ञानेश्वर बाचकर, रविंद्र म्हसे, अरुण साळवे, कांतिलाल जगधने, सतिष बोरुडे, पिंटूनाना साळवे, अशोक ढोकणे, आदिनाथ तनपूरे आदिसह अनेकजण उपस्थित होते.
तसेच अहील्यानगर येथे आज झालेल्या जिल्हा परिषद गटाची आरक्षण सोडतमध्ये राहुरी तालुक्यातील टाकळीमियॉ गट- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ब्राम्हणी गटात- सर्व साधारण व्यक्ती, गुहा गटात- सर्व साधारण पुरुष, बारागाव नांदूर गटात- अनुसूचित जमाती महिला तसेच वांबोरी गटात- सर्वसाधारण महिला अशी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























