Homeताज्या बातम्याओएलएक्सवरील जाहिरात पाहून टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने दुचाकी पळवणारा चोरटा जेरबंद; विमानतळ पोलिसांची...

ओएलएक्सवरील जाहिरात पाहून टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने दुचाकी पळवणारा चोरटा जेरबंद; विमानतळ पोलिसांची कारवाई

​पुणे:
ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वस्तू विक्रीच्या जाहिरातीचा फायदा घेऊन फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांचे प्रमाण वाढत असतानाच, विमानतळ पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक करण्यात यश मिळवले आहे. ‘ओएलएक्स’वर (OLX) टाकलेली दुचाकी विक्रीची जाहिरात पाहून टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने गाडी चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
​नेमकी घटना काय?
​या प्रकरणातील फिर्यादी यांनी आपली रॉयल इनफिल्ड मेटॉर ३५० ही दुचाकी विक्रीसाठी ‘ओएलएक्स’वर पोस्ट केली होती. १० मार्च २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता इशिता माथुर नावाच्या एका अकाऊंटवरून फिर्यादींना संपर्क करण्यात आला आणि गाडी खरेदीत रस असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर एक इसम गाडी पाहण्यासाठी आला आणि फिर्यादींकडून टेस्ट ड्राईव्ह घेण्याच्या बहाण्याने दुचाकी घेऊन पसार झाला. याप्रकरणी १४ मार्च २०२६ रोजी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३ (२) नुसार गुन्हा (रजिस्टर नंबर १५२/२०२६) दाखल करण्यात आला होता.
​असा लागला छडा
​गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार जोगदंडे यांनी ओएलएक्स अकाऊंटची माहिती मिळवली. त्यास लिंक असलेल्या मोबाईल नंबरचे सीडीआर (CDR) प्राप्त करून त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तसेच, घटनास्थळापासून तब्बल २० किलोमीटर पर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.
​आरोपीला अटक आणि मुद्देमाल जप्त
​मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहम्मद मुजबता इकबाल शेख (वय २७ वर्षे, रा. खडी मशीन चौक, पिसोळी रोड, कोंढवा, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून फिर्यादींची १ लाख रुपये किमतीची स्टैलर ब्लॅक रंगाची रॉयल इनफिल्ड मेटॉर ३५० (वाहन क्रमांक: एम एच १२ यु झेड ८०१८) हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार प्रशांत माटे करत आहेत.
​या पथकाने केली कारवाई
​सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त (पुर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (परि ०४) श्री. सोमय मुंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (लोणीकंद विभाग) श्रीमती नुतन पवार यांच्या आदेशान्वये करण्यात आली.
​विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार प्रशांत माटे, लालु कहे, अंकुश जोगदंडे व हरी पुंडे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘केतनने मला सांगितले की लग्न मोडण्यास उशीर झाला आहे’: पोलिसांनी म्हटले आहे की सिया...

चॅट्स सिया गोयलच्या विधानांच्या विरोधात आहेत, लोणावळा पोलिस म्हणतात लोणावळा: रियाल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे, पोलिसांनी दावा केला...

लोहगड किल्ला खून प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या वडिलांची भेट घेतली, जलदगती...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालयाचे आदेश दिले असून धक्कादायक लोहगड किल्ला हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली...

​कर्बलाच्या शहीदांच्या स्मरणार्थ एकतेची मिसाल: मोहरमच्या रात्री पुण्यात सरबतासाठी मोफत साखर वाटप

​पुणे, दि. २५ जून २०२६: मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना 'मोहरम'च्या नवव्या दिवशी, म्हणजेच 'कत्तलची रात्र' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रात्री, 'पंजेतन पवित्र संघटना, महाराष्ट्र राज्य' यांच्या...

मुंबई लोकल हत्या: ‘सोशल मीडिया ट्रायल’मुळे आमच्या आयुष्यावर, नोकऱ्यांवर परिणाम; असे आरोपीच्या कुटुंबीयांचे म्हणणे...

सोशल मीडिया ट्रायलमुळे आमचे जीवन आणि नोकऱ्यांवर परिणाम होत आहे, असे मुंबई लोकल ट्रेनवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीचे नातेवाईक म्हणतात मुंबई: मुंबई लोकल ट्रेनमध्ये...

सोनम रघुवंशी तुरुंगातून बाहेर आल्याने सिया गोयलने केतन अग्रवालची हत्या केली: राजाची आई. पुणे...

पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येवर इंदूरचा खून झालेला व्यापारी राजा रघुवंशी यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, सोनम रघुवंशी...

error: Content is protected !!