छोट्या-मोठ्या वाहन व्यावसायिकांवर पोलिसांचा अन्याय; गरिबांना दंड, मोठ्यांना सवलत!
पुणे, दि. १० मे: कात्रज, बिबवेवाडी, सहकार नगर व भारतीय विद्यापीठ पोलीस ठाणे क्षेत्रात पोलिसांकडून वाहनधारक व व्यावसायिकांवर होणाऱ्या भेदभावपूर्ण कारवाईने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. मोठे व्यापारी, ट्रान्सपोर्टर व राजकीय पाठबळ असलेल्या वाहनधारकांना पोलिसांकडून सवलत मिळते, तर गरिब, रिक्षाचालक, लहान वाहनधारक यांच्यावर विनाकारण दंड व कारवाईचा धडका सुरू आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांकडून दररोज रस्त्यावर उभ्या असलेल्या छोट्या वाहनांवर, विशेषतः मालवाहू टेम्पो, पिकअप गाड्या, ऑटो रिक्षा यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र त्याच भागात नियम तोडणारी मोठी ट्रक, मिनी बस किंवा राजकीय संपर्क असलेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे गरिब व मध्यमवर्गीय व्यावसायिकांना रोजच्या रोज आर्थिक फटका बसत आहे.
एका स्थानिक वाहन व्यावसायिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, “आम्ही रोज भाजी, किराणा, बांधकाम साहित्य पोचवण्यासाठी टेम्पो चालवतो. लायसन्स, कागदपत्रं सगळं असूनही पोलिस आमच्यावर दंड ठोठावतात. पण रात्रीच्यावेळी तेच पोलिस मोठ्या गाड्यांना काहीच म्हणत नाहीत.”

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.























