तीन वाहनांवरून आलेल्या आरोपींकडून मारहाण — मुंढवा पोलिसांनी तीन बालकांना बालसुधारगृहात दाखल केले
दिनांक २८/१०/२०२५ रोजी रात्री सुमारे १०:१५ वाजता फिर्यादी हे आपल्या मित्रासोबत जेवण करून खोलीबाहेर गप्पा मारत बसले असताना तीन मोटारसायकलवरून सहा अनोळखी इसम धारदार हत्यारे घेऊन आले. त्यांनी काहीही कारण नसताना फिर्यादीच्या घरावर दगडफेक केली, शिवीगाळ व दमदाटी करून दगडाने मारहाण केली. तसेच या घटनेदरम्यान उपस्थित साक्षीदारालाही जखमी केले.
या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २९३/२०२५ भारतीय दंड संहिता कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६, तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे दाखल करण्यात आला.
तपासाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षक श्री. युवराज पोमण यांच्याकडे देण्यात आली होती.
तपासादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींचा शोध घेण्यात आला. तपासात उघड झाले की, सदर गुन्हा विधीसंघर्षग्रस्त बालकांनी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने केला होता.
त्यामुळे दिनांक ३०/१०/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता तीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना मा. बालन्याय मंडळ, येरवडा येथे हजर ठेवले असता, मा. न्यायालयाने त्यांना बालसुधारगृहात दाखल करण्याचे आदेश दिले.
—
अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन :
ही कारवाई खालील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली —
मा. पोलीस आयुक्त : श्री. अमितेश कुमार
मा. सह पोलीस आयुक्त : श्री. रंजन कुमार शर्मा
मा. अपर पोलीस आयुक्त : श्री. मनोज पाटील
मा. पोलीस उपायुक्त, परिमंडळ-५ : श्री. राजकुमार शिंदे
सहायक पोलीस आयुक्त : सौ. अनुराधा उदमले
—
कारवाई करणारे अधिकारी :
वरिष्ठ पोलीस निरीक्षक : सौ. स्मिता वासनिक
पोलीस निरीक्षक (गुन्हे) : श्री. बाबासाहेब निकम
तपास अधिकारी : पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण
तपास पथक :
राज महानेार, शिवाजी जाधव, राहुल धोत्रे, शिवाजी धांडे, राहुल मोरे, योगेश गायकवाड, रुपेश तोडेकर, स्वप्नील रासकर, अक्षय धुमाळ, योगेश राऊत

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833






















