नगर मनमाड महामार्गावर डिग्रस फाटा जवळ अपघातात. राहुरी येथील 50 वर्ष महिला ठार
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965
नगर मनमाड महामार्गाची साडेसाती संपता संपेना
, काल दि. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा परिसरात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन राहुरी येथील एका ५० वर्षीय महिलेचा बळी गेला.
तरी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.
अशी मागणी मृत महिलेच्या नातेवाईकांनी केली.
या घटनेतील मृत महिला सुभद्रा साहेबराव जगधने ह्या काल दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नगरहून राहुरीकडे येत होत्या.
दरम्यान राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा परिसरात नगर मनमाड राज्य महामार्गावर असलेल्या खड्ड्यामुळे झालेल्या
अपघातात सुभद्रा जगधने यांना जबर मार लागल्याने मृत्यू झाला.
सध्या नगर मनमाड राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे.
या महामार्गावर आजपर्यंत अनेक अपघात होऊन हजारोजण मृत्यूमुखी पडले.
त्यामुळे शेकडो प्रपंच उद्धवस्थ झाले आहेत.
तरीदेखील प्रशासन रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करत आहे.
यावेळी माजी नगरसेवक सोन्याबापू जगधने म्हणाले कि, राहुरी, नगर, पाथर्डी मतदार संघात आजपर्यंत सर्वच पक्षाचे आमदार व खासदारांनी सत्ता भोगली. नगर मनमाड राज्यमार्ग, राहुरी बस स्थानक व ग्रामीण रुग्णालयाच्या मुद्द्यांवर निवडणूका जिंकल्या. मात्र अद्याप एकाही पुढाऱ्याला बस स्थानक, ग्रामीण रुग्णालय व नगर मनमाड राज्य महामार्गाचा प्रश्न मार्गी लावता आला नाही.
आजी माजी आमदार व खासदारांनी एकत्र बसून हे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी सोन्याबापू जगधने यांनी केली.
तसेच सामाजिक कार्यकर्ते कांतिलाल जगधने व ज्ञानेश्वर जगधने यांनी संबंधीत ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल दाखल करण्यात यावा, अन्यथा राज्यमार्गावर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























