Homeताज्या बातम्यापुणे पोलिसांची मोठी कारवाई: मार्केटयार्डमधील खुनाच्या प्रयत्नाचा फरार आरोपी 'चॉकलेट' अखेर जेरबंद

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: मार्केटयार्डमधील खुनाच्या प्रयत्नाचा फरार आरोपी ‘चॉकलेट’ अखेर जेरबंद

​पुणे:
मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या खुनाच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यातील आणि गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांना चकमा देऊन फरार असलेल्या एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली आहे.
​हॉटेलमध्ये जेवण करताना पडली झडप
​दिनांक १६ मे २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार त्यांच्या हद्दीत पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेत गस्त घालत होते. यादरम्यान पोलीस अंमलदार शंकर कुंभार, ओमकार कुंभार, साधना ताम्हाणे आणि सद्दाम तांबोळी यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली. मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील फरार आरोपी सिद्धार्थ गायकवाड हा भुगाव परिसरात फिरत असल्याची खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली.
​सदर माहिती मिळताच पथकाने तातडीने युनिट प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी जगताप यांना याची कल्पना दिली. त्यांनी गुन्हेगारावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. आदेश मिळताच युनिट २ च्या पथकाने भुगाव परिसरातील बातमी मिळालेल्या ठिकाणी धाव घेतली. तेथे आरोपी सिद्धार्थ गायकवाड हा एका हॉटेलमध्ये जेवण करत असताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला चहूबाजूंनी वेढून अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.
​आरोपीची पार्श्वभूमी आणि दाखल गुन्हे
​पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपले नाव सिद्धार्थ विजय गायकवाड ऊर्फ चॉकलेट (वय २४ वर्षे, रा. अण्णा भाऊ साठे वसाहत, अरणेश्वर, पुणे) असे असल्याचे सांगितले.
​आरोपी ‘चॉकलेट’ हा मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथील गु.र.नं. ३१/२०२६ मधील मुख्य पाहिजे असलेला आरोपी आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ३५२, १८९/२, १८९/४ तसेच आर्म ॲक्ट कलम ३(२४), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१) सह १३५ आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ७ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत. या कारवाईनंतर त्याला मार्केटयार्ड पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून गुन्ह्यात रीतसर अटक करण्यात आली आहे.
​तपास पथक
​ही यशस्वी कामगिरी पुणे शहर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये:
​मा. श्री. पंकज देशमुख (अपर पोलीस आयुक्त, गुन्हे)
​मा. श्री. विवेक मासाळ (पोलीस उप-आयुक्त, गुन्हे)
​मा. श्री. शैलेश संखे (सहाय्यक पोलीस आयुक्त)
​तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी जगताप यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट २ च्या खालील अंमलदारांच्या पथकाने ही कामगिरी फत्ते केली:
पोलीस अंमलदार शंकर कुंभार, ओमकार कुंभार, साधना ताम्हाणे, सद्दाम तांबोळी, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, योगेश मांढरे, संजय आबनावे, विशाल दळवी, अजीम शेख, शिवानंद कायगुडे, संतोष टकले आणि विनायक वगारे.
​पुणे शहर पोलीस जनसंपर्क अधिकारी (P.R.O.) कार्यालय, गुन्हे शाखा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महसुली सुनावणी सुलभ करण्यासाठी, अर्ध-न्यायिक प्रकरणांमध्ये होणारा विलंब रोखण्यासाठी महाने SOP जारी केले

पुणेमहाराष्ट्र सरकारने शुक्रवारी महसूल विभागाच्या सुनावणीसाठी सर्वसमावेशक मानक कार्यप्रणाली (SOP) जारी केली, ज्याचा उद्देश अर्ध-न्यायिक कार्यवाही सुव्यवस्थित करणे आणि प्रकरणे वेळेत निकाली...

महाराष्ट्र बोर्ड वर्षभर विद्यार्थी समुपदेशन, व्यसनमुक्ती सहाय्य योजना आखत आहे

पीएक: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) मानसिक आरोग्य आणि मादक पदार्थांच्या गैरवापराच्या वाढत्या चिंतांचे निराकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी एक...

महाराष्ट्र दहावी आणि बारावीपर्यंत खुल्या शाळांचा विस्तार करणार आहे

पुणे: महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ ओपन स्कूलिंग (MSBOS) विस्तारासाठी सज्ज आहे, दहावी आणि बारावीसाठी प्रमाणपत्र सादर करण्याच्या योजना आहेत. सध्या, मंडळ फक्त...

शहरातील उष्णता किरकोळ कमी झाली आहे, परंतु तापमान सामान्यपेक्षा जास्त आहे; पावसापासून दिलासा मिळण्याची...

शिवाजीनगरमध्ये शनिवारी कमाल तापमान 39.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा 2.3 अंशांनी जास्त होते. पुणे : गेल्या आठवड्याच्या तुलनेत शहरात किरकोळ घट...

बिबवेवाडीत ‘विश्वा आयुर्वेदिक उपचार केंद्र’वर गुन्हे शाखेचा छापा; २ पीडित मुलींची सुटका, महिला आरोपीला...

पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखे अंतर्गत असलेल्या अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्षाने (AHTU) बिबवेवाडी परिसरातील एका स्पा सेंटरवर मोठी कारवाई केली आहे....

error: Content is protected !!