Homeताज्या बातम्यापुणे पोलिस आयुक्तांवर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे ताशेरे..

पुणे पोलिस आयुक्तांवर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे ताशेरे..

पुणे पोलिस आयुक्तांवर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे ताशेरे; भाजप शहराध्यक्षां विरोधातील छळवणूक प्रकरणाचा अहवाल मागवला

मागासवर्गीय महिलेचा आंतरजातीय विवाह मोडायचा घाटेंचा डाव- चैत्राली धाडवे क्षीरसागर

पुणे, प्रतिनिधी — पुणे शहर भाजप अध्यक्ष धीरज घाटे, मा नगरसेविका मनीषा घाटे यांच्याविरोधातील छळवणूक आणि गंभीर आरोपांच्या प्रकरणात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने पुणे पोलिस आयुक्तांची कानउघडणी केली आहे. संबंधित प्रकरणाचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश आयोगाने दिले असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या कारवाईमुळे पुणे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

दहशत माजवणे, भ्रष्टाचार, वीजचोरी आणि पुणे महापालिकेच्या मालमत्तेचा अनधिकृत ताबा अशा विविध प्रकरणांत भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे वादग्रस्त ठरले आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि युवक काँग्रेसचे सरचिटणीस सागर धाडवे यांच्या माध्यमातून मागील काही महिन्यांपासून या प्रकरणांची प्रशासकीय पातळीवर चौकशी सुरू होती. या चौकशीत पुणे महापालिकेने एक व्यायामशाळा ताब्यात घेतली असून, लाखो रुपयांच्या वीजचोरीचे प्रकरणही उघडकीस आले आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडी सुरू असतानाच चैत्राली धाडवे क्षीरसागर यांनी त्यांचा आंतरजातीय विवाह मोडण्याचा कट रचल्याचा गंभीर आरोप करत पोलिस आयुक्त, पुणे आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, संयुक्त कुटुंब व्यवस्थेला त्रास देणे, सुखसागर नगर येथील घर पाडण्यासाठी सामूहिक गुन्हेगारी पद्धतीने एकाच वेळी घाटे समर्थकांकडून तक्रारी दाखल करणे, गुन्हेगारांकडून पती सागर धाडवे यांच्यावर नजर ठेवणे, कुख्यात गुन्हेगारामार्फत धमक्या देणे, बंदूक हातात घेऊन दहशत निर्माण करणारे स्टेटस ठेवणे तसेच व्यवसायाचे आर्थिक नुकसान करणे अशा प्रकारच्या कृत्यांचा आरोप भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, मा नगरसेविका मनीषा घाटे आणि त्यांच्या समर्थकांवर करण्यात आला आहे.

या संदर्भात दिनांक ३ जुलै २०२५ रोजी पर्वती पोलीस स्टेशन, पुणे पोलिस आयुक्त आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे लेखी तक्रार देण्यात आली होती. मात्र पाच महिने उलटूनही पोलिस प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. उलट तक्रारदार दाम्पत्यालाच धुडकावून लावण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने पुणे पोलिस आयुक्त यांना ताशेरे ओढले असून, तत्काळ चौकशी करून संबंधित अहवाल आयोगाकडे सादर करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. आयोगाच्या पत्रानुसार, यापूर्वी पाठविण्यात आलेल्या पत्रांना निर्धारित कालावधीत उत्तर न दिल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली असून, ३० दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या प्रकरणात आता पुणे पोलिस आयुक्तांकडून सादर होणाऱ्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, दोषींवर कारवाई होणार की प्रकरण दडपले जाणार, याबाबत येत्या काळात चित्र स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

निलंबित मोहल्ला समितीच्या बैठकीचे नूतनीकरण करा, पुण्यातील रहिवासी पीएमसीला सांगतात. पुणे बातम्या

पुणे: 'मोहल्ला' या शब्दाचा अर्थ त्याच्या व्याख्येनुसार जवळचा, परिसर-आधारित सामाजिक एकक आहे. शहरी प्रशासनाच्या यंत्रणेतील एक महत्त्वाचा घटक, हे युनिट 'मोहल्ला कमिटी' बैठकीच्या दशकानुवर्षे...

वडगावशेरी नागरी मेळाव्यात यांत्रिकी कचरा संकलन, विलगीकरणाचे नवीन नियम केंद्रस्थानी आहेत. पुणे बातम्या

पुणे: घनकचरा व्यवस्थापन (SWM) विभागाचे प्रमुख असलेले PMC उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत वडगावशेरीच्या रहिवाशांनी स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्या मांडल्या...

बारामतीजवळ २.४ कोटी किमतीचा ४७९ किलो गांजा जप्त | पुणे बातम्या

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांनी शनिवारी पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर बारामतीजवळील जळोची गावातील एका शेतात दोन बंद ड्रममध्ये ठेवलेला 479 किलो गांजा जप्त केला....

सार्वजनिक मार्गात अडथळा आणल्याप्रकरणी 40 हून अधिक फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल. पुणे बातम्या

पुणे: डेक्कन जिमखाना पोलिसांनी शनिवार आणि रविवारी जेएम रोड, एफसी रोड, भांडारकर रोड, कमला नेहरू पार्कजवळ, शिरोळे रोड, कर्वे रोड आणि खिलारेवाडी रोडवरील फूटपाथ...

सहा जणांवर अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल. पुणे बातम्या

पुणे : मित्र मंडळ चौकाजवळ शुक्रवारी रात्री उशिरा मित्र मंडळ चौकाजवळ 20 वर्षीय अन्न वितरण एजंटचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी येवलेवाडी पोलिसांनी तीन 19...

error: Content is protected !!