Homeताज्या बातम्या“पुण्यात खळबळ! १० तासांत खुनाचा उलगडा | ४ आरोपी अटकेत | भारती...

“पुण्यात खळबळ! १० तासांत खुनाचा उलगडा | ४ आरोपी अटकेत | भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कारवाई”

पुणे : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा अवघ्या १० तासांत उलगडा करत पुणे शहर गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ९:३० वाजता शिवशक्ती गार्डन चौकातून कात्रजकडे जाणाऱ्या सह्याद्री रोडवर इस्म नावाचा तरुण गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.घटना रात्रीची असल्याने आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने सुरुवातीला तपासात अडचणी येत होत्या. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार सचिन ससाणे, मंगेश पवार हे तपास करत असताना मृत इस्माची ओळख पटली.तपासात मृत व्यक्तीचे नाव विशाल दत्तात्रय खोब्रडे असल्याचे समोर आले. पुढील तपासात १४ एप्रिल रोजी कोंढव्यात झालेल्या भांडणातून हा वाद निर्माण झाल्याचे उघड झाले. या वादातूनच आरोपींनी विशाल खोब्रडे याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले.मृताच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. १९३/२०२६, भा.दं.वि. कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे:
विशाल दत्तात्रय खोब्रडे (वय २२ वर्षे)
अभिषेक दिलीप खोब्रडे (वय २३ वर्षे)
सचिन राजेंद्र झुंडे (वय ४३ वर्षे)
अदीनाथ शिवाजी कसबे (वय १९ वर्षे)
हे आरोपी कात्रज परिसरातील तसेच सातारा जिल्ह्यातील असल्याची माहिती तपासात समोर आली आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली,
अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम) श्री. राजेश बनसोडे,
पोलीस उपायुक्त श्री. मितेश मोहिते,
सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग श्री. राहुल आवारे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.तपास पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिलदार,
पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. कैलास धुमाळ,
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सतीश शेलार,
पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील, निलेश मोरे,
पोलीस अंमलदार महेश बारकर, मंगेश पवार, अवधूत जमदाडे, सचिन ससाणे, किरण सावळे, राजेंद्र बिसनोडे, विजय पावळ, गणेश गोसावी, दिगंबर भोईर, मल्हारीनाथ काकडे, रविंद्र गावडे, नितीन गावडे, निलेश देवकाते, मंगेश गावडे, अभिमन्यु चौधरी, सागर बोरसे, तुकाराम सुटार, संदीप आळवे यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

‘क्रिकेट मॅचमध्ये गोयल कुटुंबीयांना चेतन चौधरीबद्दल कळले, मग ‘श्रीमंत’ केतन अग्रवालसोबत सियाचे लग्न लावले...

केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये केतनचे शेवटचे क्षण टिपले आहेत. पुणे: सहआरोपी चेतन चौधरीसोबतचे नातेसंबंध समजल्यानंतर आणि...

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: काळेपडळमधून सुगंधी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त, आरोपीला ठोकल्या...

पुणे, दिनांक २६ जून २०२६: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी गुटखा, सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ पोलीस...

‘केतनने मला सांगितले की लग्न मोडण्यास उशीर झाला आहे’: पोलिसांनी म्हटले आहे की सिया...

चॅट्स सिया गोयलच्या विधानांच्या विरोधात आहेत, लोणावळा पोलिस म्हणतात लोणावळा: रियाल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे, पोलिसांनी दावा केला...

लोहगड किल्ला खून प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या वडिलांची भेट घेतली, जलदगती...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालयाचे आदेश दिले असून धक्कादायक लोहगड किल्ला हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली...

error: Content is protected !!