पुणे, दि. २४ एप्रिल २०२६ – शारीरिक तंदुरुस्तीच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी कार्यरत असलेल्या वृक्षाथॉन फाऊंडेशन तर्फे VHM Edition 5.0 या उपक्रमाच्या प्रमोशनसाठी विशेष पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली असून नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले.
या पत्रकार परिषदेला पोलिस विभागाकडून अनमोल रानपीसे, लहान मुलांचे प्रमुख म्हणून भूषण होणे, तसेच भविष्यातील अभिनेत्री अमेशा आवटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैली यासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने वृक्षाथॉनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
विशेष प्रमोशन उपक्रमात विनी कलावंत भारती आर्किड्स, रिल्स फेस स्नेहा, सानवी कुलकर्णी आणि पुष्कराज सिरसटकर यांनी उपस्थित राहून कार्यक्रमास विशेष रंगत आणली. या सर्वांनी पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक करत वृक्षाथॉनला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
वृक्षाथॉन फाऊंडेशनचे संस्थापक विजय गायकवाड यांनी या उपक्रमामागील संकल्पना स्पष्ट करताना सांगितले की, “फिटनेससोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे.” त्यांना सौ. रेश्मा गायकवाड यांचेही सहकार्य लाभत असल्याचे नमूद करण्यात आले.
याशिवाय सोनाली मोरे (सदस्या), विदुषा लुनावत (मार्केटिंग हेड), अमोल सातवे तसेच इतर
VHM Edition 5.0 ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरणादायी आणि सामाजिक जबाबदारी जपणारा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले. झाडे लावणे, पर्यावरण रक्षण करणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
हा भव्य वृक्षाथॉन सोहळा दि. ६ जुलै २०२६ रोजी, पोलिस ग्राउंड, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमात पुणे परिसरासह राज्यातील विविध भागांतून स्पर्धक सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.
स्पर्धेत विविध वयोगटांसाठी स्वतंत्र रन कॅटेगरी ठेवण्यात आल्या आहेत. पर्यावरणप्रेमी, फिटनेसप्रेमी, तरुणाई आणि कुटुंबांसाठी हा कार्यक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. आयोजकांनी संपूर्ण महाराष्ट्रातून स्पर्धक सहभागी होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. �
रेस कॅटेगरी पुढीलप्रमाणे :
०३ किमी – ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी वॉक
०५ किमी – नवशिके आणि आरोग्य जागरूकतेसाठी रन/जॉग
१० किमी – इमिन रनर्स आणि एलिट अॅथलिट्ससाठी
२१ किमी – सर्व व्यावसायिकांसाठी हाफ मॅरेथॉन
नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून पर्यावरण संरक्षण आणि शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश पुढे न्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी https://www.vrukshathon.com/� या संकेतस्थळाला भेट देता येणार आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























