कात्रज – मागील अनेक महिन्यांपासून भारती विद्यापीठ परिसर, वंडर सिटी परिसर, त्रिमूर्ती चौक परिसर, आंबेगाव पठार परिसरात कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेतेचे अक्षरशः तीनतेरा झाल्याचे पाहायाल मिळत असून पोलिस प्रशासनातर्फे पेट्रोलिंग होताना दिसत नाही.याबरोरच ११२ क्रमांकावर तक्रार केल्यावर सबंधित बीट मार्शल किंवा पेट्रोलिंग करणारे पोलिस कर्मचारी तात्काळ पोहचण्यास उशीर होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत.ओमकार स्वरूप सोसायटी, वेंकटेश टॉवर सोसायटी येथे वास्तव्यास असणाऱ्या तसेच कै. अभिजीत पतंगराव कदम बहुद्देशीय क्रीडासंकुल येथे येणाऱ्या महिला भगिनी, नागरिकांना येथील प्रमुख रस्त्यावर बसणाऱ्या टवाळखोर मुलां-मुलींकडून प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.दररोज सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ३ ते ४ पर्यंत टवाळकी करत, याठिकाणी घोळक्याने सिगारेट मारणारे गुन्हेगार तसेच अल्पवयीन गुन्हेगारी प्रवृत्तीचे मुले स्थानिकांना अरेरावी करताना सातत्याने दिसून आले आहे. यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी नगरसेवक युवराज बेलदरे यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सावळाराम साळगावकर यांच्याकडे केली असून तसे त्यांनी पत्र दिले अनेकवेळा विनंती करुन कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई झाली नसल्याने स्थानिकांनी एकत्र येत सबंधित घोळक्याने असणाऱ्या मुलांचा सामना केल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. मागील काळात फालेनगर, वाई अर्बन बँक गल्लीमध्ये याठिकाणी दिवसा चोरीच्या घटना घडल्या आहेत.चालत्या गाड्यांवरून मंगळसूत्र ओढण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. सदर विषय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असून, आपण स्वतः याबावत लक्ष देऊन, नागरिकांना कायदा सुव्यवस्थेबाबत विश्वास द्यावा, अशी मागणीही या पत्रात करण्यात आलेली आहे.प्रतिक्रियेत मिळालेल्या माहितीचा आम्ही अभ्यास केला आहे. याबाबत आम्ही सतर्क आहोत. संबंधित भागात आमचे पूर्णपणे लक्ष आहे. सध्या पायी पेट्रेलिंग वाढवली आहे. यामध्ये स्वतः मी जातीने लक्ष देत असून पुढील काळात अशा घटना आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल.- सावळाराम साळगावकर, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, भारती विद्यापीठ, पोलिस ठाणे.आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























