Homeताज्या बातम्याभारती विद्यापीठ रोड परिसरातील एका मसाज सेंटरवर छापा टाकून ५ पीडित महिलांची...

भारती विद्यापीठ रोड परिसरातील एका मसाज सेंटरवर छापा टाकून ५ पीडित महिलांची सुटका

पुणे : मसाज सेंटरवर छापा – ५ महिलांची सुटका, दोन आरोपींवर गुन्हा दाखल
पुणे शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने मोठी कारवाई करत दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड परिसरातील एका मसाज सेंटरवर छापा टाकून ५ पीडित महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी मसाज सेंटरच्या मालकासह दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक १७/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार “योग आयुर्वेदिक पोटली मसाज सेंटर”, स. नं. ३४/३, व्यंकटेश ब्लॉसम सोसायटी, दुसरा मजला, फ्लॅट नं. २०२, दत्तनगर, भारती विद्यापीठ रोड, पुणे येथे महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती मिळाली.
या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली बनावट ग्राहक पाठवून पडताळणी करण्यात आली. माहिती सत्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ छापा टाकला.
या कारवाईदरम्यान संबंधित मसाज सेंटरमधून ५ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तसेच मसाज सेंटर चालवणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे भा.न्या.सं. १४३(१)(३), ३(५) तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच मा. पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईत पोलिस निरीक्षक छगन कापसे यांच्यासह पोलिस अंमलदार आव्हळे, भिवरकर, जाधव, नतफ, भुजबळ तसेच म.पो.अंमलदार कंक यांनी सहभाग घेतला.
पुणे शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात बेकायदेशीर वेश्याव्यवसायावर आळा बसण्यास मदत होणार असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

निष्काळजीपणामुळे बाळाच्या मृत्यूप्रकरणी 4 डॉक्टर, 2 परिचारिकांवर एफआयआर. पुणे बातम्या

पुणे : गेल्या वर्षी अकरा महिन्यांच्या बालिकेच्या मृत्यूप्रकरणी निष्काळजीपणा आणि फसवणूक करून मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी नवी पेठेतील चिन्मय नर्सिंग होमच्या चार बालरोगतज्ज्ञ आणि दोन...

IAF लढाऊ विमानाच्या ‘हार्ड लँडिंग’मुळे पुण्याची धावपट्टी बंद पडली, रात्रीच्या उड्डाणांवर परिणाम झाला. पुणे...

पुणे: भारतीय हवाई दलाच्या (IAF) विमानाचा समावेश असलेल्या एका घटनेनंतर त्याची धावपट्टी लँडिंग आणि टेक-ऑफसाठी बंद करण्यात आल्याने शुक्रवारी रात्री 11 च्या...

खंडणी प्रकरणातील खून उघड; चंदननगर पोलिसांची जलद कारवाई, ०६ तासांत आरोपी जेरबंद

पुणे | प्रतिनिधी पुणे शहरातील चंदननगर परिसरात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा उलगडा करत खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलिसांनी अवघ्या ०६ तासांत आरोपींना...

टँकर चालकांकडून दरवाढ, पाणीपट्टी भरूनही पीएमसीच्या अकार्यक्षम पुरवठ्यावर रहिवाशांची टीका. पुणे बातम्या

पुणे: उंड्री, महंमदवाडी आणि एनआयबीएम ऍनेक्सी येथील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवासी महापालिकेच्या पुरवठ्याचा एक थेंबही न मिळाल्याने पाणी कर भरत आहेत, तरीही खाजगी टँकर...

बिशप स्कूलने 15 एप्रिल रोजी उंड्री कॅम्पसमध्ये आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे...

पुणे: बिशप एज्युकेशन सोसायटीने शुक्रवारी पालकांना एक परिपत्रक जारी केले आणि 15 एप्रिल रोजी शुल्काच्या निषेधाच्या अंतर्गत चौकशीनंतर उंड्री कॅम्पसमध्ये कथित घुसखोरी, व्यत्यय आणि...

error: Content is protected !!