“लाल बहादूर शास्त्री स्मारकाची तोडफोड ; दोषींवर गुन्हे दाखल करा अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन”
पुणे : दांडेकर पूल परिसरातील मांगीर बाबा मंदिरासमोरील भारताचे लाडके माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री ”यांच्या पर्णाकृती पुतळा व स्मारकाची अनधिकृतपणे तोडफोड चा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रभाग क्रमांक २७ चे प्रभाग समन्वयक प्रतीक उर्फ बाळा आल्हाट यांनी केला आहे. याबाबत पुणे महानगरपालिका आयुक्त व अधीक्षक अभियंता यांना सविस्तर तक्रार देऊन संबंधित विकासक, ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेनुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आल्हाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईकनवरे या विकासकाच्या वतीने दांडेकर पूल सुशोभिकरण चे काम सुरू असून पुणे मनपा कडून तशी वर्क ऑर्डर मिळवली आहे , वर्क ऑर्डर सोबत विकासक नाईकनवरे यांनी कोणता ही पुणे मनपा चा वैध प्रशासकीय ठराव , पुतळा समितीची परवानगी किंवा अधिकृत कामाचा करारनामा नसताना स्मारक परिसरात तोडफोड केली. स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर शुक्रवार दि. ८ मे रोजी रात्री हे काम थांबविण्यात आले.
सदर प्रकरणात कोणताही पुणे मनपा चा करारनामा, प्रशासकीय ठराव, मंजूर आराखडा, मिनिट्स ऑफ मिटिंग किंवा पोलिस संरक्षण उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच मांगीर बाबा चौकातील स्मारकाचा राडारोडा व अवशेष मागील शुक्रवार पासून अनेक दिवस आजपर्यंत तसेच पडून असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेखातीर आणी लाल बहादुर शास्त्री यांच्या स्मारकाची अनधिकृत तोडफोड केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस स्टेशन ला तक्रार दाखल करण्यात आली आहे, त्यावर पोलिस प्रशासन कारवाई करीत आहे. 
“महापुरुषांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. दोषींवर तात्काळ कारवाई झाली नाही तर शिवसेना शैलीत रास्ता रोको, ठिय्या आंदोलन, महानगरपालिका कार्यालयास घेराव व पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येईल,” असा इशारा प्रतीक उर्फ बाळा आल्हाट यांनी दिला आहे.
या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित बिल्डर विकासक, ठेकेदार, सहभागी लोक व महानगरपालिका अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणी कायदेशीर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनच काम सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे .

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























