Homeताज्या बातम्यालोणीकाळभोर पोलिसांची धडक कारवाई : गुटखा-तंबाखू विक्रेत्यांवर 104 कारवाई करण्यात आली..

लोणीकाळभोर पोलिसांची धडक कारवाई : गुटखा-तंबाखू विक्रेत्यांवर 104 कारवाई करण्यात आली..

लोणीकाळभोर पोलिसांची धडक कारवाई : गुटखा-तंबाखू विक्रेत्यांवर 104 कारवाई..

लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत गुटखा, सुगंधित तंबाखू, सिगारेट आदी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीचे पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री. राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकांनी 2024 वर्षभरात कार्यक्षेत्रातील विविध पानटपऱ्या, दुकाने व फेरीवाल्यांवर तपासणी करून COTPA कायदा 2003 अंतर्गत महत्त्वाच्या कारवाया केल्या आहेत.

यामध्ये आतापर्यंत एकूण 104 कारवाई करण्यात आली असून विविध दुकानांतून ₹2,70,900/- किमतीचा तंबाखूजन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित दुकानचालकांवर कायदेशीर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे.

व्यावसायिकांसोबत जनजागृती बैठक

दिनांक 08/12/2024 रोजी वरिष्ठ निरीक्षक पन्हाळे यांनी पोलिस स्टेशनमध्ये कार्यक्षेत्रातील पानटपरी व्यावसायिकांची बैठक घेतली. या बैठकीत :
शासनाने लागू केलेल्या तंबाखू उत्पादनांवरील निर्बंधांची सविस्तर माहिती देण्यात आली.
ई-सिगारेट, सुगंधित तंबाखू, गुटखा आदी पदार्थांच्या विक्रीवर संपूर्ण बंदी असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अधिकृत परवानगीशिवाय तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे कायद्यानुसार दंडनीय असल्याचे सांगण्यात आले.
अवैध विक्री आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, याची स्पष्ट सूचना देण्यात आली.
या बैठकीस लोणीकाळभोर पोलिस स्टेशन हद्दीतील 43 पानटपरी चालक/मालक उपस्थित होते.

पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग

या मोहिमेत खालील अधिकारी उपस्थित राहून कायदेशीर माहिती व मार्गदर्शन केले :

सौ. स्मिता पाटील – पोलीस निरीक्षक (गुन्हे)

श्री. कृष्णा बाबर – सहाय्यक पोलीस निरीक्षक

श्री. अंकुश गोराटे – सहाय्यक पोलीस निरीक्षक

बैठकीच्या शेवटी पोलीस हवालदार रवि आहेर यांनी उपस्थित व्यावसायिकांचे आभार मानले.

आवाहन

लोणीकाळभोर पोलीस स्टेशनमार्फत पुढील काळातही अशा प्रकारच्या अवैध तंबाखू विक्रीवर कठोर कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी अवैध विक्रीची माहिती पोलिसांना कळवून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीजवळ २.४ कोटी किमतीचा ४७९ किलो गांजा जप्त | पुणे बातम्या

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांनी शनिवारी पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर बारामतीजवळील जळोची गावातील एका शेतात दोन बंद ड्रममध्ये ठेवलेला 479 किलो गांजा जप्त केला....

सार्वजनिक मार्गात अडथळा आणल्याप्रकरणी 40 हून अधिक फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल. पुणे बातम्या

पुणे: डेक्कन जिमखाना पोलिसांनी शनिवार आणि रविवारी जेएम रोड, एफसी रोड, भांडारकर रोड, कमला नेहरू पार्कजवळ, शिरोळे रोड, कर्वे रोड आणि खिलारेवाडी रोडवरील फूटपाथ...

सहा जणांवर अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल. पुणे बातम्या

पुणे : मित्र मंडळ चौकाजवळ शुक्रवारी रात्री उशिरा मित्र मंडळ चौकाजवळ 20 वर्षीय अन्न वितरण एजंटचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी येवलेवाडी पोलिसांनी तीन 19...

नागरी वास्तवांसह सण समतोल राखण्यासाठी रहिवासी जाणीवपूर्वक होळीचा पर्याय निवडतात. पुणे बातम्या

पुणे: शहराच्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली कारण नागरिकांनी होळीसाठी तयारी केली आणि उत्सवाच्या शैलीत परंपरेचा मिलाफ केला.लक्ष्मी रोड आणि महात्मा फुले मंडई...

औंध-बोपोडी वॉर्डातील पायाभूत प्रकल्प, विकासकामे तातडीने पूर्ण करावीत, अशी नगरसेवकांची नगराध्यक्षांची मागणी. पुणे बातम्या

पुणे : शहरातील औंध-बोपोडी भागातील नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांना गती देण्याची विनंती नागरी प्रमुख नवल किशोर राम यांच्याकडे...

error: Content is protected !!