Homeताज्या बातम्यालोणी काळभोर पोलीसांची अवैध जुगार अड्डयावर कारवाई, ५,४३,०१०/-रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.

लोणी काळभोर पोलीसांची अवैध जुगार अड्डयावर कारवाई, ५,४३,०१०/-रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.

लोणी काळभोर पोलीसांची अवैध जुगार अड्डयावर कारवाई, ५,४३,०१०/-रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.

लोणी काळभोर पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटन करण्याकरीता स्वतंत्र पथकाची नेमणुक करुन अवैध धंदयांवर प्रभावी कारवाई ची मोहिम राबविली आहे.

सदर मोहिमेचे अनुषंगाने दि. ०८/१२/२०२५ रोजी लोणी काळभोर पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे, सहा. पोलीस निरीक्षक श्री कृष्णा बाबर, पोलीस उप निरीक्षक सर्जेराव बोबडे व त्यांचे पथकाने लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत प्रभावी गस्त घातली. सदर गस्तीदरम्यान त्यांना २०/०० वा. चे सुमारास मौजे लोणी काळभोर येथील गुरुकृपा निवास माळी मळा ता. हवेली, जि. पुणे येथे छतावर पत्र्याचे शेडमध्ये पैशांवर जुगार खेळला जात असल्याची खबर प्राप्त झाली.

प्राप्त खबरीनुसार लोणी काळभोर पोलीसांनी सदर ठिकाणी सापळा रचुन छापा कारवाई करुन ११ इसमांना जुगाराचे साहित्य, जुगाराचे खेळातील रोख रक्कम, त्यांचे अंगझडतीदरम्यान मिळुन आलेले मोबाईल हॅन्डसेट व जुगाराचे अड्ड्यावर येणेसाठी त्यांनी वापरलेली ५ दुचाकी वाहनांसह ताब्यात घेतले. सदर कारवाई दरम्यान रोख रक्कम २५,६६०/-रुपये व इतर मुद्देमाल असा एकुण ५.४३,०१०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीस उप निरीक्षक सर्जेराव बोबडे यांनी सविस्तर जप्ती पंचनाम्याने जप्त केला आहे.

सदर छापा कारवाई दरम्यान ताब्यात घेणेत आलेले इसम नामे १) सचिन सोपान सकट वय २० वर्षे रा. लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे २) विशाल हंसराज गुप्ता वय २५ ३) मंगेश पुंडलीक शिंदे वय २९ ४) गणेश लक्ष्मण सानप वय ३८ ५) योगेश कैलास चौधरी वय ३७ ६) अर्जुन पन्नालाल येरवल वय २८ ७) अहमद शब्बीर मोगल वय ४० ८) विवेक मधुकर काळभोर वय ४८ ९) शब्बीर हाजीमियाँ शेख वय ९ १०) अल्फाज अलीम शेख वय २१ ११) सयाजी वामन पवार वय २९ सर्व राहणार लोणी काळभोर ता. हवेली जि. पुणे यांचेविरुध्द तसेच अवैध धंदा चालक कानीफनाथ जगदाळे रा. माळी मळा लोणी काळभोर ता. हवेली, जि. पुणे तसेच सदर इसम ज्याठिकाणी जुगार खेळत होते त्या गुरुकृपा निवास या घराचे घरमालक अरुण सोपान काळे यांचेविरुध्द लोणी काळभोर पोलीस ठाणेस गु. र. नं. ५५५/२०२५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम ४ (५) प्रमाणे गुन्हा नोंदवीणेत आला आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांचे समुळ उच्चाटण करण्याचे अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पन्हाळे यांनी पोलीस ठाणेस पदभार स्विकारलेपासुन आपपावेतो अवैध दारु धंद्यांवर १०३ कारवाया, अवैध गांजा विक्रीवर १४ कारवया, अवैध जुगारांवर : ३६ कारवाया, अवैध गुठखा विक्री, वाहतुक व साठा धारकावर १ अशा एकुण १५४ प्रभावी कारवाया केल्या आहेत. त्याचप्रमाणे अवैध मटका चालवीणारे २ इसमांविरुध्द एम.पी.डी.ए. कारवाई केली असून १ अवैध जुगार चालकास तडीपार केले आहे. तसेच अवैध दारु विक्रेत्या १ महिलेस देखील तडीपार करणेत आले आहे. यापुढे देखील प्रभावी कारवाया करुन अवैध धंद्यांचे लोणी काळभोर हद्दीतुन समुळ उच्चाटन करण्याचा त्याचा मानस असल्याचे त्यांनी आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

निलंबित मोहल्ला समितीच्या बैठकीचे नूतनीकरण करा, पुण्यातील रहिवासी पीएमसीला सांगतात. पुणे बातम्या

पुणे: 'मोहल्ला' या शब्दाचा अर्थ त्याच्या व्याख्येनुसार जवळचा, परिसर-आधारित सामाजिक एकक आहे. शहरी प्रशासनाच्या यंत्रणेतील एक महत्त्वाचा घटक, हे युनिट 'मोहल्ला कमिटी' बैठकीच्या दशकानुवर्षे...

वडगावशेरी नागरी मेळाव्यात यांत्रिकी कचरा संकलन, विलगीकरणाचे नवीन नियम केंद्रस्थानी आहेत. पुणे बातम्या

पुणे: घनकचरा व्यवस्थापन (SWM) विभागाचे प्रमुख असलेले PMC उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत वडगावशेरीच्या रहिवाशांनी स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाच्या समस्या मांडल्या...

बारामतीजवळ २.४ कोटी किमतीचा ४७९ किलो गांजा जप्त | पुणे बातम्या

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांनी शनिवारी पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर बारामतीजवळील जळोची गावातील एका शेतात दोन बंद ड्रममध्ये ठेवलेला 479 किलो गांजा जप्त केला....

सार्वजनिक मार्गात अडथळा आणल्याप्रकरणी 40 हून अधिक फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल. पुणे बातम्या

पुणे: डेक्कन जिमखाना पोलिसांनी शनिवार आणि रविवारी जेएम रोड, एफसी रोड, भांडारकर रोड, कमला नेहरू पार्कजवळ, शिरोळे रोड, कर्वे रोड आणि खिलारेवाडी रोडवरील फूटपाथ...

सहा जणांवर अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल. पुणे बातम्या

पुणे : मित्र मंडळ चौकाजवळ शुक्रवारी रात्री उशिरा मित्र मंडळ चौकाजवळ 20 वर्षीय अन्न वितरण एजंटचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी येवलेवाडी पोलिसांनी तीन 19...

error: Content is protected !!