दिनांक: 6 जून 2025
स्थळ: सातारा जिल्हाधिकारी कार्यालय
आज दिनांक 6 जून 2025 रोजी पुरोगामी संघर्ष परिषद या नोंदणीकृत सामाजिक संघटनेच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन वरिष्ठ प्रदेशाध्यक्ष डॉ. प्राचार्य बाळासाहेब साठे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. सदर निवेदनात दिनांक 16 एप्रिल 2025 रोजी घडलेल्या जानूनबुजून अपघात प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर प्रकरणामध्ये बाबाजी दिनकर भोसले आणि त्यांचा मुलगा श्लोक भोसले यांना MH10-BM-9800 या स्कॉर्पिओ गाडीने मागून जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता व इरादा लक्षात घेता, हा खुनाचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट आहे. तथापि, अद्याप आरोपीवर योग्य ती कारवाई झालेली नाही. पोलिसांची भूमिका संशयास्पद असून, तक्रारदारांना आरोपीला स्वतः पकडून आणण्यास सांगण्यात येत आहे.
संघटनेच्या मागण्या पुढीलप्रमाणे:
अपघातात वापरलेली गाडी तातडीने जप्त करावी.
दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे.
मुख्य आरोपी अनिल शर्मा याला अटक करून गुन्हा दाखल करावा.
खोटे नाव सांगून तपास भुलवण्याचा प्रयत्न केला गेल्याने दुसरा गुन्हा दाखल करावा.
पीडित कुटुंबाच्या आर्थिक अडचणी व मानसिक त्रासाची जबाबदारी आरोपीवर टाकावी.
तपास अधिकाऱ्यांचा दबाव आणि धमक्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे.
गुन्हा अद्याप न्यायालयात का दाखल झाला नाही, याची खुली माहिती द्यावी.
जर दहा दिवसांत योग्य कारवाई झाली नाही, तर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
या निवेदनावर डॉ. साठे यांच्यासह अर्चना घोरपडे, विकासराव सरगडे, अश्विनी नवले, हनुमंत जाधव, शंकर चव्हाण, श्रीपती बोभाटे, संजय आडागळे आणि अशोक आडागळे यांचे स्वाक्षरीत सहमती दर्शविण्यात आली.
📌 प्रतिज्ञा: अन्यायाविरुद्ध संघर्ष सुरुच राहील, पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत संघटना माघार घेणार नाही.

सूचना / Disclaimer:
या पोर्टलवरील सर्व बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि मजकूर हे केवळ माहिती व जनहितासाठी प्रसारित केले जातात. आमचा उद्देश कुणाच्याही भावना दुखावणे किंवा अफवा पसरवणे हा नाही. कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी आम्ही ती सत्य व खात्रीशीर असल्याची पुष्टी करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.