Homeताज्या बातम्यास्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचा उच्च न्यायालयात जामीन अर्ज

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचा उच्च न्यायालयात जामीन अर्ज

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेचा उच्च न्यायालयात जामीन अर्ज

पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; २६ फेब्रुवारी २०२६ : पुणे शहराला हादरवून सोडणाऱ्या स्वारगेट बलात्कार प्रकरणाला एक वर्ष पूर्ण झाले असले, तरी अद्याप न्यायालयात आरोप निश्चिती झालेली नाही. आरोपी दत्तात्रय गाडे याने जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय येथे धाव घेतली असून, पुणे सत्र न्यायालयात निर्दोष मुक्ततेचा अर्ज दाखल केला आहे. या अर्जांवर आदेश आल्यानंतरच खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा होणार आहे.

*काय आहे प्रकरण?*
२५ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे स्वारगेट आगारातील शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, शिरूर) याने तरुणीवर दोन वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. गुन्ह्यानंतर तो गावातील शेतात लपून बसला होता. पुणे पोलिसांनी त्याला अटक करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृह येथे न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.

*८९२ पानी आरोपपत्र; ८२ साक्षीदारांची नोंद*
तपास अधिकारी शैलेश संखे यांच्या पथकाने ५२ दिवसांत ८९२ पानांचे आरोपपत्र दाखल केले. एकूण ८२ साक्षीदारांची चौकशी करण्यात आली असून, पाच साक्षीदारांचे जबाब न्यायालयात नोंदवले गेले आहेत. १२ पंचनाम्यांमध्ये गुगल सर्च हिस्टरी, ध्वनी तीव्रता पडताळणी, ओळख परेड, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शी निवेदनांचा समावेश आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसार, तर पीडितेच्या वतीने ॲड. श्रीया आवले बाजू मांडत आहेत.

*जामीन अर्ज फेटाळला; उच्च न्यायालयात धाव*
आरोपीचा जामीन अर्ज पुणे न्यायालयाने यापूर्वी फेटाळला आहे. त्यानंतर आरोपीने ॲड. वाजेद खान बीडकर यांच्या मार्फत उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला आहे. तसेच सत्र न्यायालयात निर्दोष मुक्ततेची मागणी केली आहे. आरोपीच्या अर्जांना पुणे पोलिस, सरकारी वकील आणि पीडितेच्या वकिलांनी विरोध दर्शवला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरच आरोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

*तपासातील ठळक मुद्दे*

घटनास्थळावर सापडलेले केस व शर्टाचे बटण रासायनिक तपासणीत आरोपीचेच असल्याचे निष्पन्न.

पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपीला घटनास्थळी पाहिल्याचे जबाब दिले.

ससून रुग्णालयातील तीन तज्ज्ञ डॉक्टरांनी आरोपी लैंगिकदृष्ट्या सक्षम असल्याचा अहवाल दिला.

सीसीटीव्ही चित्रीकरणात आरोपी घटनास्थळी उपस्थित असल्याचे नमूद.

मोबाइलच्या ‘गुगल सर्च हिस्टरी’मध्ये अश्लील व्हिडिओ पाहिल्याचे आढळले.

ओळख परेडमध्ये पीडितेने आरोपीची ओळख पटवली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

थेऊर ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष; स्मशानभूमीची अवस्था बिकट, ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट

थेऊर: तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थेऊर गावातील स्मशानभूमीची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत...

शिमला ऑफिस-संचेती हॉस्पिटल रोडवरील गर्दी कमी करण्यासाठी PMC साखर संकुल परिसरातील रेल्वे क्रॉसिंगवर Y-आकाराच्या...

पुणे: पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) खडकी आणि पाटील इस्टेट-संगमवाडी या रस्त्यांवरील कनेक्टिव्हिटी सुधारण्याच्या उद्देशाने साखर संकुल-वाकडेवाडी मार्गाजवळील रेल्वे रुळांवर Y आकाराचा उड्डाणपूल बांधण्याची योजना अंतिम...

वेताळ टेकडीवरील मियावाकी वृक्षारोपण योजनेबाबत तज्ञ आणि रहिवासी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करतात. पुणे बातम्या

पुणे: पर्यावरणवादी आणि रहिवाशांनी वेताळ टेकडीच्या काही भागांवर ग्लिरिसिडिया वृक्षारोपण आणि मियावाक्सी प्रकारची देशी वृक्ष लागवड करण्याच्या वनविभागाच्या योजनेबद्दल सावधगिरी बाळगण्याचे आवाहन...

पटवर्धन यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे उद्दिष्ट अनुदानित महाविद्यालयांना केवळ नफेखोरीसाठी खाजगी विद्यापीठांमध्ये रूपांतरित होण्यापासून रोखण्यासाठी...

पुणे: 'फक्त नफेखोरीच्या उद्देशाने' अनुदानित, बिगर सरकारी महाविद्यालयांना खासगी विद्यापीठांमध्ये रूपांतरित करू देण्याचा आपला हेतू नाही, असे राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने शनिवारी स्पष्ट केले.28...

हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावरील 12 मेट्रो स्थानके जूनअखेर सुरू होण्याची शक्यता | पुणे बातम्या

पुणे: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो (लाईन 3) ची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना जूनअखेर आंशिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे, पहिल्या टप्प्यात 12 स्थानके सुरू होण्याची शक्यता आहे, अनिवार्य...

error: Content is protected !!