अरुण पवार यांची पिंपळे गुरव ते वायसीएम रुग्णालय मार्गांवर बसथांब्याची पीएमपीएमएल’कडे मागणी
पिंपळे गुरव ते वायसीएम रुग्णालय, डी. वाय. पाटील कॉलेज, नेहरूनगर व मासुळकर कॉलनी या वर्दळीच्या मार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन बस थांबे समाविष्ट करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अरुण पवार यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भा अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा जनविकास संघाचे सदस्य श्रीकृष्ण जाधवर व मालोजी भालके यांनी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांना निवेदन दिले. त्यांनी पीएमपीएमएलचे अधिकारी सतीश गव्हाने यांना याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.
अरुण पवार यांनी निवेदनात म्हटले आहे, की पिंपळे गुरव परिसरातील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी, तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वायसीएम रुग्णालय, डी. वाय. पाटील कॉलेज, नेहरूनगर व मासुळकर कॉलनी याठिकाणी जावे लागते. मात्र, नियमित बस नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होते. या मार्गांवर बस सुरू झाल्यास नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल.
दरम्यान, मागणीची दखल घेऊन या मार्गांवर नागरिकांची सोय व्हावी यासाठी हे काम तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन पीएमपीएमएल प्रशासनाने दिले आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या या सकारात्मक प्रतिसादामुळे परिसरातील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833




















