अहिल्यानगर नामांतरानंतरही जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीवर ‘अहमदनगर’चे नाव कायम!
📞 सहसंपादक: शिवाजी दवणे
📲 क्राईम महाराष्ट्र न्यूज – 9730170965
📍 अहिल्यानगर (जि. जामखेड) –
राज्य सरकारने अधिकृत निर्णय घेऊन १३ मार्च २०२४ रोजी अहमदनगर शहर, तालुका व जिल्ह्याचे नाव बदलून “अहिल्यानगर” असे नामकरण केले. या निर्णयाला केंद्र सरकारनेही ४ ऑक्टोबर २०२४ रोजी मान्यता दिली होती आणि ८ ऑक्टोबर २०२४ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.
या नामांतराची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी (ता. जामखेड) येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे २०२३ रोजी केली होती, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयाला पाठिंबा दर्शविला होता.
🔹 सध्या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये ‘अहिल्यानगर’ हेच नाव वापरले जात आहे. इमारती, फलक, दस्तऐवजांमध्ये हे नामकरण लागू करण्यात आले आहे.
➡️ मात्र मिरी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि नेते राजुमामा तागड यांच्या निदर्शनास आले आहे की, अजूनही अहिल्यानगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रशासकीय इमारतीवर “अहमदनगर” हेच नाव दर्शविले जात आहे.
✳️ त्यांनी प्रशासन आणि न्यायालय विभागाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, तातडीने न्यायालयाच्या फलकावर ‘अहिल्यानगर’ हेच नाव लावण्यात यावे अशी मागणी केली आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























