बाल विद्या मंदिर मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी
पुणे – बाल विद्या मंदिर शाळेत साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व टिळक महाराज यांचं विचारमूल्य कार्य प्रभावी शब्दांत सादर केलं. भक्ती खिलारी, साई पाटील, रुद्र दिघे, स्पर्श दंडे व वज्रेश्वरी मोरे या विद्यार्थ्यांनी त्यांचं योगदान प्रभावीपणे उलगडलं.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे एकमेव मराठी लेखक आहेत ज्यांचे साहित्य २७ जागतिक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. त्यांनी लिहिलेली “फकीरा” कादंबरी महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने सन्मानित आहे. त्यांनी १३ लोकनाट्ये, ३५ कादंबऱ्या, १३ कथा संग्रह, ७ चित्रपट कथा, १५ पोवाडे, ३ नाटके व इतर साहित्यनिर्मिती केली आहे.
“जात हे वास्तव आहे आणि गरीबी कृत्रिम आहे” अशा स्पष्ट व परखड विचारांनी त्यांनी दलित, कामगार व सामान्य जनतेमध्ये प्रबोधन केले.
तसेच “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक यांचं कार्य देखील विद्यार्थ्यांनी गौरवपूर्वक सादर केलं.
कार्यक्रमात वृक्षारोपण आणि वृक्ष वाटप देखील करण्यात आले. प्रास्ताविक श्री. हेंद्रे दत्तात्रेय यांनी, तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती आढाव अलकादेवी होत्या. सूत्रसंचालन श्रीमती मीना बर्डे व आभारप्रदर्शन श्री. संदीप रासकर सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक श्री. गुलाब मोरे सर व संपूर्ण शिक्षक वृंद यांनी मेहनत घेतली.
सहसंपादक – शिवाजी दवणे
क्राईम महाराष्ट्र न्यूज
मो.: 9730170965

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833




















