पुणे : शिवजयंतीनिमित्त रोजा इफ्तार पार्टीत हिंदू–मुस्लिम ऐक्याचा संदेश
पुणे शहरातील मंगलवार पेठ परिसरातील मदीना कॉम्प्लेक्स (मकान नं. 416) येथे शुक्रवार दिनांक 6 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6.45 वाजता *श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त “सुराज्य रोजा इफ्तार पार्टी”*चे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम नवजागृती मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुलभाऊ शर्मा यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर रमजान महिन्यानिमित्त मुस्लिम बांधवांसोबत सामूहिक रोजा इफ्तार करण्यात आला. कार्यक्रमात हिंदू–मुस्लिम समाजातील अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. अरविंदभाऊ शिंदे (अध्यक्ष, पुणे शहर काँग्रेस व नगरसेवक) उपस्थित होते. तसेच आर.के. सय्यद फाउंडेशनचे अध्यक्ष इरफानभाई सय्यद, पंजेतन पवित्र संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष हनिफभाई शेख यांच्यासह विविध सामाजिक व मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या इफ्तार पार्टीत सर्व समाजातील लोकांनी एकत्र येत शिवजयंती आणि रमजान या दोन महत्त्वाच्या प्रसंगांचे औचित्य साधून हिंदू–मुस्लिम ऐक्य, भाईचारा आणि सामाजिक सलोखा याचा सुंदर संदेश दिला. उपस्थित मान्यवरांनीही समाजात शांतता, एकोपा आणि बंधुभाव टिकवण्याचे आवाहन केले.
संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत अशा कार्यक्रमांमुळे समाजात एकतेची भावना अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त केले.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























