सोमनाथ हरेर यांची भाजपा युवा मोर्चा अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
सहसंपादक शिवाजी दवणे क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज 9730170965
खोसपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते तसेच माजी सरपंच सोमनाथ भाऊ हरेर यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. हरेर यांना निवडीचे पत्र आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष दिलीपराव भालसिंग व युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन वाईकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी बोलताना सोमनाथ हरेर म्हणाले की, युवा मोर्चा उपाध्यक्ष ची संधी मला माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब व युवा नेते अक्षय दादा कर्डिले यांचे मुळे मिळाली आहे आणि याचा आम्ही संधीच सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि नक्कीच भाजप पक्षासाठी जेवढे करता येईल तेवढे कार्य आम्ही चांगलं करणार आहोत अशी ग्वाही देत आहोत. यावेळी खोसपुरी सोसायटीचे चेअरमन भीमराव आव्हाड, माजी सरपंच बाबा भाई शेख, ज्येष्ठ नेते प्रल्हाद भिसे, माजी सरपंच मुबारक भाई पठाण, माजी सरपंच अविनाश भाऊ आव्हाड,सरपंच करीमभाई बेग, ग्रामपंचायत सदस्य आसाराम भाऊ वाघमोडे, विजय भिसे, अण्णा पाटील, भारत हारेर , निलेश आव्हाड व आधी खोस्परी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























