गॅस दरवाढी विरोधात शिवसेना आक्रमक..महिलांनी चुलीवर भाकरी थापून केला सरकारचा निषेध
पुणे :- अबकी बार महागाई ची सरकार” महागाई चा झटका लाडक्या बहिणींना फटका” अश्या घोषणानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुणे शहर वतीने कसबा पेठेत आंदोलनात घेण्यात आले, 
यावेळी शिवसैनिक महिलांनी रस्त्यावरच चूल पेटवून त्यावर भाकरी केल्या महागाई ची झळ आज गोरगरीब, सामान्य माणसाच्या चुलीपर्यंत पोहचली आहे, त्यामुळे एकेकाळी १० रुपये गॅस वाढला की केंद्र सरकार च्या विरोधात रस्त्यावर बसणारी भाजप नेता स्मृती इराणी हिचे पोस्टर लावण्यात आले आणि भाजपची इराणी तुझी स्मृती गेली कुठे ? हा प्रश्न उपस्थित करण्यात आला.महागाई थांबवण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे त्यांनी लोकांना फसवून २०१४ सालापासून सरकार चालवले आहे लोकांना महागाई ने हैराण केले असताना भाजप सरकार लोकांमध्ये धार्मिक द्वेष निर्माण करत आहे असे शहरप्रमुख संजय मोरे बोलताना म्हणाले. यावेळी आंदोलनास शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, रामभाऊ पारिख, उपशहर प्रमुख आबा निकम, उमेश वाघ, शहर संघटक राजेंद्र शिंदे, संतोष गोपाळ, मकरंद पेठकर, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, निवडणूक समन्वयक निकिता मारटकर, विद्या होडे, विभागप्रमुख मुकुंद चव्हाण, चंदन साळुंके, राजेश मोरे, योगेश पवार, नंदू येवले, अनिल दामजी, भगवान वायल, महिला आघाडी उपशहर संघटिका अमृत पठारे, सलमा भाटकर, रोहिणी कोल्हाळ, सुनीता खंडाळकर, ज्योती चांदेरे, करुणा घाडगे, सुलभा तळेकर, पद्मा सोरटे, अंगणवाडी सेना शहरप्रमुख गौरी चव्हाण, सोनाली जुनवणे, रेणुका साबळे, गायत्री गरुड, सविता गोसावी, रुपाली जिंतीकर, नेहा कुलकर्णी, स्मिता पवार, पूजा खेडकर, नमिता चव्हाण, युवासेना शहर संघटक राम थरकुडे, सनी गवते, समन्वयक युवराज पारिख, संदीप गायकवाड, रूपेश पवार, अमर मारटकर, हनुमंत दगडे, दत्ता घुले, आशुतोष मोकाशी, नागेश खडके, अमोल घुमे, नितीन निगडे, गणेश घोलप, सूरज मोराळे, बकुळ डाखवे, गिरीश गायकवाड, जुबेर तांबोळी, सूरज खंडगळे, बाळासाहेब गरुड, परेश राव, आरोग्य सेनेचे रमेश क्षीरसागर, मुकुंद काकडे, राहुल शेडगे, आशिष अढळ, बाळासाहेब क्षीरसागर, समीर खान, जुबेर शेख, गजानन बागडे, अरविंद जैन, विनायक मेमाने, सतीश कसबे, शिवा मेमाणे, संतोष हुडे, निरंजन कुलकर्णी, विकी धोत्रे, अनिल जाधव, आनंद बेंद्रे, इंद्रजीत शिंदे, सतीश कसबे, दिनेश निकम, तुषार भोकरे, अमित जाधव, अजय शिलखाने, प्रवीण रणदिवे, युवासेनेचे सोहम जाधव, चिंतामण मुंगी, अक्षय हबीब, गणेश काकडे, नीरज नांगरे, किशोर गिरमे, आदी उपस्थित होते.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























