पूणे- तळजाईत गुंडांचा धुडगूस, पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या लेकींवर हात टाकला; धक्काबुक्की, शिवीगाळ आणि बेदम मारहाणत्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. दरम्यान, तक्रार करूनही पोलीस दखल घेत नसल्याने त्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. त्यानंतर पोलीस आयुक्तालयावरही धडक दिली.
पुणे फिटनेस अकादमीच्या 150 ते 170 तरुण-तरुणी रोज पोलीस भरतीची तयारी करतात. दररोज तळजाई टेकडीवरील
मैदानावर सराव करण्यासाठी येतात. आज नेहमीप्रमाणे हे तरुण-तरुणी सराव करीत होते. तत्पूर्वीच सरावाच्या मैदानात चार पैलवान थांबले होते. तरुण-तरुणींनी या चौघांना बाजूला होण्याची विनंती केली. मात्र त्यांनी तरुणींना धक्काबुक्की करीत तरुणांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दोन पोलीस अधिकारी आमचे मित्र आहेत. त्यामुळे तुम्ही कोणाकडेही गेलात तरी आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही,” अशी धमकी पैलवानांसह त्यांच्या साथीदारांनी तरुण-तरुणींना दिली. दरम्यान, रात्री उशिरा सहकार नगर पोलीस ठाण्यात सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.
पाठलाग… मैत्रीसाठी धमक्या
सरावा वेळी संबंधित गुंड पैलवान अश्लील नजरेने पाहतात.
अनेकदा नको ती शेरेबाजी करतात.
फेसबुक, इन्स्टाग्रामवर मैत्री करण्यासाठी वारंवार धमकी देतात.
रोज घरापर्यंत पाठलाग करतात.
धक्काबुक्की करत आमचा विनयभंग केला.
आरोपींना वाचवण्यासाठी मंत्रालयातून फोनाफोनी – लेशपाल जवळगे
”राज्यातील विविध ग्रामीण भागांतील मुले पुण्यात अभ्यासाला येतात. मात्र अशा प्रकारच्या काही घटनांमुळे संबंधितांच्या मनावर आघात होतो. आरोपींना वाचवण्यासाठी थेट मंत्रालयातून पोलीस अधिकाऱयांना फोनाफोनी झाली. त्यामुळे संध्याकाळी सात वाजेपर्यंत पैलवानांविरुद्ध गुन्हा दाखल केला नाही,” असा गंभीर आरोप ‘वंदे मातरम्’ संघटनेचे लेशपाल जवळगे यांनी केला आहे. ”विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रात्रभर पोलीस आयुक्तालयाबाहेरच शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























