मिरी येथील जागृत देवस्थान राजा वीरभद्र महाराज यात्रेनिमित्त दरवर्षी कुस्त्यांचा जंगी हंगामा भरत असतो. त्यासाठी मिरी येथे सुसज्ज कुस्त्यांचे स्टेडियम उभारणीचे कामास सुरुवात करण्यात आली.
सहसंपादक शिवाजी दवणे क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज 9730170965
पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील राजा वीरभद्र महाराजांची दरवर्षी भव्य यात्रा भरते. या यात्रेनिमित्त कुस्त्यांचा भव्य जंगी हंगामा भरविण्यात येतो. या यात्रेनिमित्त भरविण्यात येणाऱ्या हंगाम्यात राज्यातुन तसेच परराज्यातुन

नामांकित पैलवान हजेरी लावत असतात. या मल्लांच्या कुस्त्यासाठी आता मिरी येथे सुसज्ज स्टेडियम बांधण्याचा निर्णय ग्रामस्थांनी व यात्रा कमिटीने घेतला आहे. या कुस्त्यांच्या मैदानाशेजारी पैलवानांच्या सोईसाठी सुसज्ज हाॅल बांधण्यात येणार आहे. या का स्टेडियमच्या बांधकामाच्या पायाभरणीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी यावेळी सरपंच पैलवान जालिंदर गवळी, पैलवान विष्णुपंत सोलाट, राहुल गवळी, एकनाथ झाडे, राजुमामा तागड, शुभम मोटे,मयुरतात्या तागड सह या कामाचे ठेकेदार, कर्मचारी, मिरी परिसरातील पैलवान, देवस्थान ट्रस्टी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833




















