आमदार शिवाजीराव कर्डिले अनंतात विलीन.
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज
सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965
*राजकारणात कधीही भरुन न निघणारी एक मोठी पोकळी निर्माण झाली.*
राहुरी प्रतिनिधी,
राहुरी, नगर, पाथर्डी मतदार संघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आज दि. १७ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे मतदार संघात प्रचंड खळबळ उडाली.
राहुरी, नगर, पाथर्डी मतदार संघातील भाजपाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांना आज दि. १७ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास त्रास होऊ लागल्याने त्यांना अहिल्यानगर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार सुरु असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आमदार शिवाजीराव कर्डिले हे राहुरी, नगर, पाथर्डी मतदार संघातून तीन वेळा भाजप पक्षाकडून आमदार म्हणून निवडून गेले होते. या दरम्यान त्यांनी मतदार संघाचे नेतृत्व करुन भापजाला बळकट बनवीले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. तरीदेखील त्यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेच्या भेटीगाठी सुरु ठेवल्या. आजारी असताना देखील जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम त्यांनी केले.
आज दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना भांडे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र नियतीला काही वेगळेच हवे होते. आणि आज पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेऊन सर्वांचा निरोप घेतला. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आकस्मात निधनाने मतदार संघात शोककळा पसरली. तसेच राजकारणात कधीही भरुन न निघणारी एक मोठी पोकळी निर्माण झाली.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833



















