शनिवारवाडा प्रकरणाचा निषेध; पण मूळ कारण – “महिलांना मशिदीत प्रवेशबंदी” — मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशनची ठाम भूमिका
पुणे:
शनिवारवाडा परिसरात मुस्लिम महिलांनी नमाज अदा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेवर आक्षेप घेतला असून, भाजपच्या नेत्यांकडून या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.
या पार्श्वभूमीवर मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन ने दोन स्पष्ट मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली आहे:
—
१. सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या कृतींचा निषेध
कोणत्याही धर्माच्या नावाखाली तणाव निर्माण करणाऱ्या कृती अस्वीकार्य आहेत. आम्ही सामाजिक एकोपा आणि सौहार्द बिघडवणाऱ्या सर्व कृतींचा तीव्र शब्दांत निषेध करतो.
भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाडा परिसरातील मजारावर झेंडा लावण्याचा जो कथित प्रयत्न केला, तो अत्यंत गैरजबाबदार आणि भडकाऊ प्रकार आहे.
पूर्वीही सारसबाग, कोथरूड दांडिया प्रकरण किंवा आझम कॅम्पस संदर्भातील वक्तव्यांतून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न दिसून आला आहे. शहरातील शांततेला धोका पोहोचवणारी ही भूमिका अत्यंत निंदनीय आहे.
—
२. घटनेचे मूळ कारण — महिलांना मशिदीत प्रवेश नाकारणे
महिलांना मशिदीत प्रवेशबंदी हा मुद्दा या घटनेच्या मुळाशी आहे. जर मशिदींची दारे महिलांसाठी खुली असती, तर त्या महिलांना सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्याची गरजच पडली नसती.
आजही पुणे शहरातील अनेक मशिदींमध्ये महिलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित नमाजखाने नाहीत. हेच “व्यवस्थात्मक अपयश” या वादाचे मूळ कारण आहे.
—
डॉ. फरहा शेख यांचा लढा
डॉ. फरहा अन्वर शेख गेली दहा वर्षे “महिलांना मशिदीत प्रवेश” या घटनात्मक व सामाजिक हक्कासाठी लढा देत आहेत.
त्यांनी देशातील अनेक मशिदींना लेखी पत्रव्यवहार करून महिलांना प्रवेशाची मागणी केली, मात्र परवानगी नाकारण्यात आली.
सध्या त्या याच विषयावर सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका प्रलंबित आहे.
हा केवळ धार्मिक नव्हे, तर महिलांच्या समानतेचा व सन्मानाचा घटनात्मक हक्क आहे. जर हा हक्क प्रत्यक्षात आला असता, तर आजचे असे वाद निर्माण झाले नसते.
—
आमच्या प्रमुख मागण्या:
1. प्रशासनाने तात्काळ शांतता प्रस्थापित करून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या सर्व राजकीय किंवा धार्मिक कृतींवर कठोर कारवाई करावी.
2. ऐतिहासिक स्थळांवर धार्मिक कार्यक्रमांबाबत स्पष्ट नियमावली जारी करावी.
3. मुस्लिम समाजाने आणि प्रशासनाने महिलांना मशिदीत प्रवेशाचा प्रश्न गांभीर्याने घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
महिलांसाठी सन्मानजनक, सुरक्षित प्रार्थनास्थळाची सोय हीच अशा घटनांना प्रतिबंध घालणारी खरी उपाययोजना आहे.
—
नोट:
शनिवारवाडा येथे नमाज अदा केलेल्या घटनेचे आम्ही समर्थन करत नाही. मात्र त्या महिलांना ज्या परिस्थितीतून हा निर्णय घ्यावा लागला, त्या परिस्थितीचे आणि त्यांच्या मूलभूत हक्काचे आम्ही ठाम समर्थन करतो.
—
संपर्क:
डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख
अन्वर हुसेन शेख
📞 8459867838 / 9511696198
📧 missfarhafoundation@gmail.com

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























