दुःखद: भटके-विमुक्तांचा आधारवड हरपला; मारुतीदादा कदम यांचे निधन
पुणे | प्रतिनिधी
भटके-विमुक्त समाजाचे खंबीर नेतृत्व, वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर झटणारे आणि भारतीय मायनॉरिटी सुरक्षा महासंघचे अध्यक्ष मारुतीदादा कदम यांचे १९ फेब्रुवारी २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे सामाजिक चळवळीतील एक प्रेरणादायी, झुंजार आणि तडफदार नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
मारुतीदादा कदम यांनी आपले संपूर्ण आयुष्य तळागाळातील समाजाच्या प्रश्नांसाठी वाहिले. ‘भटके-विमुक्त समाज संघटना’ आणि ‘भारतीय मायनॉरिटी सुरक्षा महासंघ’च्या माध्यमातून त्यांनी हजारो कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढा दिला. केवळ आंदोलने न करता शासनदरबारी पाठपुरावा करत वंचितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
सामान्य कुटुंबातून पुढे येत त्यांनी समाजकारणात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फुटली. भटके-विमुक्त समाजाच्या सन्मानासाठी आणि हक्कांसाठी त्यांनी राबवलेले उपक्रम आजही कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे ठरत आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने केवळ कदम कुटुंबावरच नव्हे, तर संपूर्ण वंचित समाजावर शोककळा पसरली आहे.
आज, २० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २:०० वाजता कोंढवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते अंतिम दर्शनासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मारुतीदादा कदम यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांनी समर्थपणे पुढे न्यायला हवा, अशी भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची पाऊलवाट भटके-विमुक्त समाजासाठी कायम प्रेरणादायी राहील, हेच त्यांना खरे श्रद्धांजली ठरेल.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























