Homeताज्या बातम्यानशामुक्त तरुणाईसाठी पुणे पोलिसांचा पुढाकार – ‘NO DRUGS VOLUNTEER’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नशामुक्त तरुणाईसाठी पुणे पोलिसांचा पुढाकार – ‘NO DRUGS VOLUNTEER’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, दि. ०८ एप्रिल २०२६ — पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने तरुणांमध्ये वाढत्या अंमली पदार्थांच्या वापरावर आळा घालण्यासाठी “NO DRUGS VOLUNTEER” ही विशेष जनजागृती मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत लष्कर पोलिस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
कार्यक्रमाचे आयोजन डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी, अवनी महाविद्यालय आणि पुण्यनगरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे तरुणांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जागरूक करणे आणि समाजात नशामुक्तीचा संदेश पोहोचवणे हा आहे.
पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या मोहिमेत विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक नुकसान याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच, अंमली पदार्थांच्या विक्री व सेवनाविरोधात पोलिसांना माहिती देण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमाला पोलीस सहआयुक्त, गुन्हे शाखेचे अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच विविध महाविद्यालयांचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी “NO DRUGS VOLUNTEER” म्हणून सहभागी होत समाजात जनजागृती करण्याची शपथ घेतली.
पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई सुरू असून नागरिकांनीही या लढ्यात सहकार्य करणे आवश्यक आहे. तरुणांनी स्वतःपासून सुरुवात करून इतरांना या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले.
या मोहिमेमुळे पुणे शहरात नशामुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले गेले असून, भविष्यात अधिकाधिक शाळा व महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
— Crime Maharashtra Live News

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रावेत, किवळे रहिवासी, नगरसेवक महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटले. पुणे बातम्या

पुणे : रावेत आणि किवळे येथील रहिवाशांनी स्थानिक नगरसेविका ऐश्वर्या तरस यांच्यासह बुधवारी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण कंपनी लिमिटेड) च्या अधिकाऱ्यांची...

पुण्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरीन वायूची गळती; 24 रूग्णालयात दाखल पुणे न्यूज

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात गुरुवारी क्लोरीन वायू गळती झाल्याने २४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी...

चांगल्या नफ्यासाठी ऑनलाइन शेअर-ट्रेडिंगचे आमिष टेकनी 2.3cr | पुणे बातम्या

पुणे: हडपसरजवळील शेवाळवाडी येथील एका ३६ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याने २६ जानेवारी ते ११ मार्चदरम्यान ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यात जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडून २.३ कोटी...

जुन्नरजवळ शेत तलावात दोन मुलांचा बुडून मृत्यू. पुणे बातम्या

पुणे : पुण्यापासून ९५ किमी अंतरावर असलेल्या जुन्नर तालुक्यातील बल्लाळवाडी येथे मंगळवारी १२ आणि ८ वर्षांच्या दोन मुलांचा शेत तलावात बुडून मृत्यू...

निगडीतील १३२ केव्ही हाय टेंशन ट्रान्समिशन टॉवरवर चढल्याने वाहतूक कोंडी, वीजवाहिनी बंद; 3 तासांनंतर...

पुणे: निगडीतील यमुनानगर भागातील 132 केव्ही हाय-टेन्शन ट्रान्समिशन टॉवरवर पोलिसांनी 'मानसिकदृष्ट्या अस्थिर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तरुणाने सोमवारी रात्री तीन तास चाललेले बचावकार्य यशस्वीरित्या संपले.अज्ञात...

error: Content is protected !!