Homeताज्या बातम्या“RTE प्रवेशात बनावट भाडेकरारांचा सुळसुळाट; शिवसेना आक्रमक – ‘गरजूंना न्याय नसेल तर...

“RTE प्रवेशात बनावट भाडेकरारांचा सुळसुळाट; शिवसेना आक्रमक – ‘गरजूंना न्याय नसेल तर आंदोलन अटळ!’”

“RTE प्रवेशात बनावट भाडेकरारांचा सुळसुळाट; शिवसेना आक्रमक – ‘गरजूंना न्याय नसेल तर आंदोलन अटळ!’”

पुणे, दि. १३ एप्रिल २०२६ —
महाराष्ट्र शासनाच्या RTE 25% प्रवेश योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, बनावट भाडेकरार व खोट्या पत्त्यांच्या आधारे प्रवेश मिळवण्याचे प्रकार वाढत असल्याची तक्रार शिवसेनेचे पुणे शहर/जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तथा शिव पालक सेनेचे अध्यक्ष अनंत रामचंद्र घरत यांनी केली आहे.

यासंदर्भात अनंत घरत यांनी प्राथमिक शिक्षण संचालक श्री. शरद गोसावी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या भेटीत गोसावी यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत योग्य ती चौकशी करून गरजू व पात्र विद्यार्थ्यांनाच RTE योजनेचा लाभ मिळेल याची खात्री देण्याचे आश्वासन दिले.

अनंत घरत यांच्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, काही पालक जाणीवपूर्वक बनावट भाडेकरार व खोटी पत्त्याची कागदपत्रे सादर करून शाळेजवळ राहत असल्याचा खोटा आभास निर्माण करतात. यामुळे शासनाने निश्चित केलेल्या अंतर निकषांचा गैरवापर होत असून, खऱ्या अर्थाने गरजू व पात्र विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. हा प्रकार केवळ फसवणूक नसून सामाजिक न्यायाच्या तत्त्वांवर आघात करणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना अनंत घरत म्हणाले,
“RTE प्रवेश प्रक्रियेत सादर करण्यात येणाऱ्या भाडेकरार व पत्त्यांच्या कागदपत्रांची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे. सध्या राज्यात प्राथमिक शिक्षणाचा बाजार मांडला गेला असून, काही शिक्षण संस्था पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोनातून काम करत आहेत. विद्यार्थ्यांना पुस्तके, वह्या, गणवेश यासाठी ठरावीक प्रकाशन व दुकानदारांची सक्ती केली जाते, हा पालकांवर सरळ अन्याय आहे. शिवसेना हा अन्याय सहन करणार नाही.”

शिवसेनेने प्रशासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
• RTE प्रवेशातील सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी करावी
• संशयित प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष स्थळ तपासणी (Physical Verification) करावी
• दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून प्रवेश रद्द करावा
• भविष्यात गैरप्रकार टाळण्यासाठी पारदर्शक व कडक पडताळणी यंत्रणा लागू करावी
• संबंधित शाळा व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कारवाई करावी

शेवटी, जर या गंभीर प्रकरणात तात्काळ व ठोस कारवाई झाली नाही, तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला निश्चित केले: पोलिसांनी उघड केले की...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

error: Content is protected !!