Homeताज्या बातम्याघरगुती गॅसचा अवैध साठा उघड; १०३ सिलेंडर जप्त, आरोपीस बेड्या

घरगुती गॅसचा अवैध साठा उघड; १०३ सिलेंडर जप्त, आरोपीस बेड्या

घरगुती गॅसचा अवैध साठा उघड; १०३ सिलेंडर जप्त, आरोपीस बेड्या
पुणे | प्रतिनिधी
काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरगुती गॅसचा अवैध साठा करून काळाबाजार करणाऱ्या दुकानावर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १०३ गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

वरिष्ठांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांवर कारवाई सुरू असताना पोलिस अंमलदार महादेव शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हांडेवाडी परिसरात एक इसम घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरून काळाबाजार करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला असता, ‘काया मल्टी सर्व्हिसेस’ या दुकानाच्या शेजारी मालती सुदृढी कंपनीच्या सुपर कॅरी टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर साठवून ठेवलेले आढळून आले. तपासादरम्यान दुकानामध्ये घरगुती सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये तसेच ५ किलोच्या सिलेंडरमध्ये गॅस ट्रान्सफर सुरू असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित इसमास ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने आपले नाव नितीन हनुमंत होळकर (वय २८, रा. हांडेवाडी, पुणे) असे सांगितले. त्याच्याकडे गॅस साठवणूक व ट्रान्सफरसाठी कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.
या छाप्यात पोलिसांनी एकूण १०३ गॅस सिलेंडर, चारचाकी वाहन आणि इतर साहित्य असा सुमारे १० लाख ९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी काळेपडळ पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १६४/२०२६ अन्वये अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम ३ व ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उपआयुक्त परिमंडळ ६, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सूचनेनुसार पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक अमित शेटे, अंमलदार प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतीक लाहिडे, अमोल फडतरे, विशाल तांबे, शाहिद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, सहेम तांबोळी, प्रदीप बेडकेकर, महादेव शिंदे आणि गिरीराज जगताप यांनी सहभाग घेतला.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, घरगुती गॅसचा अशा प्रकारे गैरवापर करणे अत्यंत धोकादायक असून यामुळे मोठे अपघात होऊ शकतात. अशा अवैध प्रकारांची माहिती तात्काळ पोलिसांना देऊन सहकार्य करावे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला निश्चित केले: पोलिसांनी उघड केले की...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

error: Content is protected !!