Homeताज्या बातम्यापुणे पोलिसांची मोठी कारवाई: ६० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; खेड शिवापूर टोल...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: ६० लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; खेड शिवापूर टोल नाक्यावर ट्रकला घातला गराडा

​पुणे: पुणे शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने खेड शिवापूर टोल नाका येथे मोठी कारवाई करत प्रतिबंधित विमल गुटख्याचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून एकूण ८० लाख ३२ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
​नेमकी घटना काय?
​दिनांक २८/०४/२०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे अधिकारी व कर्मचारी आंबेगाव परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलीस अंमलदार अमोल सरडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांनी मागवलेला प्रतिबंधित गुटख्याचा ट्रक (क्र. एम.एच.११ डी.डी.-६५२७) कात्रज घाटमार्गे पुण्यात येणार आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी २८ एप्रिलच्या मध्यरात्री ००:३० वाजल्यापासून कात्रज घाटात सापळा रचला होता. मात्र, बराच वेळ होऊनही ट्रक न आल्याने अधिक तपास केला असता, सदर ट्रक खेड शिवापूर टोल नाका येथे थांबल्याची खात्री झाली.
​सापळा आणि अटक
​वरिष्ठांच्या परवानगीने पुणे शहर पोलिसांनी राजगड पोलीस ठाणे (पुणे ग्रामीण) यांची मदत घेतली आणि खेड शिवापूर टोल नाका येथे उभ्या असलेल्या ट्रकवर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी ट्रक चालक श्रीशैल तम्माराय हाळके (वय ३२, रा. उमदी, ता. जत, जि. सांगली) याला ताब्यात घेतले. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल गुटखा आढळून आला. हा गुटखा पुणे पोलीस आयुक्तालयातील दोन सराईत आरोपींनी शहरात विक्रीसाठी मागवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
​जप्त केलेला मुद्देमाल:
​प्रतिबंधित विमल गुटखा: ६०,२२,८००/- रुपये.
​टाटा कंपनीचा ट्रक (MH 11 DD 6527): २०,००,०००/- रुपये.
​सॅमसंग मोबाईल हँडसेट: १०,०००/- रुपये.
​एकूण किंमत: ८०,३२,८००/- रुपये.
​कायदेशीर कारवाई
​या प्रकरणी राजगड पोलीस ठाणे (पुणे ग्रामीण) येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक १६६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​तपास पथक
​ही यशस्वी कारवाई पुणे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त श्री. रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त श्री. पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (आर्थिक व सायबर/गुन्हे) श्री. विवेक मासाळ आणि सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे ३) श्री. शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
​या पथकात अंमली पदार्थ विरोधी पथक-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे, संजय राजे, अमोल सरडे, निलेश जाधव, विशाल भिलारे, मंगेष गुंड, अक्षय शिर्के, महिला पोलीस अंमलदार आशा भिंगारे आणि राजगड पोलीस ठाण्याच्या पथकाचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पूर्वीचा तोटा भरून काढण्यासाठी पुण्याचा माणूस दुसऱ्या ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यात पडला, 66 लाख रुपये...

पुणे: शेअर-ट्रेडिंग घोटाळ्यातील नुकसान भरून काढण्यासाठी महागड्या बोलीमध्ये, एका खाजगी कंपनीचा कर्मचारी (57) पुन्हा दुसऱ्या कथित जागतिक गुंतवणूक मंचाला बळी पडला आणि...

टुरिस्ट व्हिसावर ‘धार्मिक प्रचार’ केल्याबद्दल 3 अमेरिकन नागरिकांना ‘भारत सोडा’ची नोटीस मिळाली आहे. पुणे...

टुरिस्ट व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन अमेरिकन नागरिकांना पुणे पोलिसांनी 'लिव्ह इंडिया नोटीस' बजावली आहे. पुणे: धार्मिक प्रचार कार्यात सहभागी होऊन पर्यटन...

नियमित VO2 चाचणी विक्रम प्रस्थापित करणारी मॅरेथॉनर पुणे न्यूज

विज्ञानाने मार्ग दाखवला. पायांनी ते पार केले. नियमित VO2 कमाल चाचणी — वाढत्या कामाच्या ओझ्याखाली शरीर किती कार्यक्षमतेने ऑक्सिजन वापरते याचे मोजमाप...

ILS विधी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या ध्वज शुल्काच्या समस्या आणि प्रशासनातील त्रुटी | पुणे बातम्या

संस्थेच्या कार्यपद्धतीत गट सुधारणा शोधतो पुणे: आयएलएस लॉ कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अध्यक्षांना पत्र लिहून बेकायदेशीर शुल्क वसुली, विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपून टाकणे, पारदर्शकतेचा...

महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये, 46-47° सेल्सिअस उष्णतेमुळे भाजीपाला पिकांचे नुकसान होते; शेतकऱ्यांना उत्पादन नुकसान, भाव...

पुणे: महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ४२-४७ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या अति उष्णतेमुळे शेतातील भाजीपाला पिके जळू लागली आहेत, शेतकरी आणि उत्पादक गटांनी उत्पादनात मोठ्या प्रमाणात...

error: Content is protected !!