Homeताज्या बातम्यापुणे पोलिसांची मोठी कारवाई: कोंढव्यातून २२ किलो गांजा जप्त, महिला आरोपीसह दोघांना...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: कोंढव्यातून २२ किलो गांजा जप्त, महिला आरोपीसह दोघांना अटक

पुणे: पुणे शहरातील अंमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर लगाम लावण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढवा भागात छापा टाकून २२ किलो गांजासह दोघांना अटक केली आहे.
​गोपनीय बातमीवरून कारवाई
​दिनांक २९/०४/२०२६ रोजी परिमंडळ ०५ चे पोलीस अधिकारी व अंमलदार हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख यांना एक विश्वासार्ह बातमी मिळाली. कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गल्ली नं. ३०, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द येथे एक महिला आणि एक पुरुष ओळखीच्या लोकांना गांजा विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
​या माहितीची खात्री पटल्यानंतर पोलीस उप आयुक्त श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार परिमंडळ ०५ चे पथक आणि कोंढवा पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्तपणे त्या ठिकाणी छापा टाकला.
​दोघांना बेड्या आणि मुद्देमाल जप्त
​या छाप्यात पोलिसांनी खालील दोन आरोपींना अटक केली आहे:
​यास्मीन करीम शेख (वय ४५ वर्षे, रा. शिवनेरीनगर, कोंढवा).
​आमिर समीर शेख (वय १९ वर्षे).
​आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी २१.१९८ किलो ग्रॅम गांजा, रोख रक्कम, मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण ९,७४,९६०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये एन.डी.पी.एस. (NDPS) अॅक्ट कलम 8(c), 20(b)(ii)(B), २९ अन्वये गुन्हा (गु.र.नं ३२८/२०२६) दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जगताप करत आहेत.
​तपास पथक
​ही यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील आणि पोलीस उप आयुक्त श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. या पथकात खालील अधिकारी व अंमलदारांचा समावेश होता:
​अधिकारी: वपोनि कुमार घाडगे, पोलीस उप निरीक्षक अल्फाज शेख आणि रविंद्र गावडे.
​पोलीस अंमलदार: प्रविण उत्तेकर, सर्फराज देशमुख, कैलास सपकाळ, हणमंत कांबळे, पुजा चोरमले, विशाल मेमाणे, अमोल हिरवे, स्वागत पळसे, अमित सुर्यवंशी, शंकर माटे, सिध्देश झेंडे आणि दत्तात्रय धुमाळ.
​महिला पोलीस अंमलदार: पुजा नागरगोजे आणि आर्या सांळुके.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिंपरी चिंचवड पोलिसांनी पाच देशी बनावटीचे पिस्तूल जप्त, तिघांना अटक. पुणे बातम्या

पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी वेगवेगळ्या भागातून पाच देशी बनावटीची पिस्तुले जप्त केली असून, तीन जणांना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले...

राष्ट्रवादीने झीशानला एमएलसी जागेसाठी निवडल्यानंतर मिटकरी निराशा व्यक्त करतात. पुणे बातम्या

पुणे: महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने झीशान सिद्दीक यांना उमेदवारी देण्याचा निर्णय, अर्ज दाखल करण्याच्या काही तास अगोदर घेतल्याने पक्षाच्या सदस्यांमध्ये निराशा पसरली आहे, ज्यांनी...

​श्रीक्षेत्र थेऊर येथील ‘महाराजस्व समाधान शिबिराला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १००० पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला...

सहसंपादक बापू सोनवणे थेऊर ​थेऊर: महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या आणि महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर्गत थेऊर मंडल भागात भव्य...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास लातूरमधून अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पुणे: भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका मुलीवर वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी लातूर जिल्ह्यातून...

लोहगावमध्ये पादचारी महिलेला लुटणाऱ्या दोघांना ८ तासांत अटक; गुन्हे शाखा युनिट ७ ची धडाकेबाज...

पुणे: लोहगाव परिसरातील कलवड वस्ती येथे एका महिलेची सोन्याची चैन आणि मोबाईल चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ७ ने अवघ्या ८...

error: Content is protected !!