पुणे: पुणे शहर पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत मोठे यश संपादन केले आहे. वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत एम.डी. (मॅफेड्रॉन) विक्री करणाऱ्या आणि ग्रामीण भागात ड्रग्ज बनवण्याचा कारखाना सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी करोडो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून मुख्य सूत्रधारासह अनेक आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
दिनांक १६/०४/२०२६ रोजी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास, केसनंद येथील जोगेश्वरी वजनकाटा, थेऊर रोड परिसरात सार्वजनिक रस्त्यावर पोलीस पथकाने सापळा रचला होता. यावेळी संशयास्पदरीत्या आढळलेल्या अनिस शम्मू सय्यद (वय २८, रा. मांजरी बुद्रुक) आणि हरी उत्तम उफाडे (वय ३५, रा. सिद्धार्थनगर, वाघोली) यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे १,१०,०००/- रुपये किमतीचे ५ ग्रॅम ५ मि.ग्रॅम निव्वळ मॅफेड्रॉन (एम.डी.) मिळून आले. हे ड्रग्ज त्यांनी विक्रीसाठी आणि स्वतःच्या वापरासाठी बेकायदेशीरपणे बाळगले होते.
तपासाचे चक्र आणि अटक आरोपी
या प्रकरणी वाघोली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २५९/२०२६ नुसार एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम ८(क), २१(ब), २१(क) आणि २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान या ड्रग्ज रॅकेटमध्ये आणखी काही नावांचा खुलासा झाला, ज्यामध्ये खालील व्यक्तींचा समावेश आहे:
सुमित अशोक घुले (वय ४१, रा. मांजरी, पुणे) – मुख्य सूत्रधार.
प्रतिक उर्फ सोन्याबापू होले (वय ३२, रा. लोणीकंद).
ऋषीकेश अंकुश उर्फ राम यनभर (वय २९, रा. कारेगाव, ता. शिरूर).
कारखाना सुरू करण्याचा होता कट
पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार सुमित घुले हा त्याचा साथीदार आकाश अशोक ढवळे याच्या मदतीने पुणे शहर, लोणीकंद, कोरेगाव भिमा, शिक्रापूर, कारेगाव, रांजणगाव आणि शिरूर ग्रामीण भागात ड्रग्जची विक्री करत होता.
विशेष म्हणजे, २०१६ मधील कुप्रसिद्ध कुरकुंभ ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विपीनकुमार श्रीरामसागर पंडीत (जो जानेवारी २०२५ पासून जामिनावर बाहेर आहे) याला मदतीला घेऊन ही टोळी ग्रामीण भागात एम.डी. ड्रग्ज बनवण्याचा कारखाना सुरू करण्याच्या तयारीत होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी त्यांचा कट उधळून लावला.
अहमदाबादमधून मुख्य सूत्रधाराला अटक
पोलीस अंमलदार प्रदीप मोटे, शेखर शिंदे आणि विशाल गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, मुख्य सूत्रधार सुमित घुले याला गुजरात मधील अहमदाबाद येथून शिताफीने अटक करण्यात आली. घुले याला ड्रग्ज पुरवणारा रामनिवास रानुराम हा देखील पोलिसांच्या रडारवर आहे.
पोलीस पथक
ही यशस्वी कारवाई पुणे शहराचे पोलीस उपायुक्त (परिमंडळ ७) श्री. सोमय मुंडे आणि वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चंदन व त्यांच्या पथकाने केली आहे.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























