Homeताज्या बातम्या“जागतिक ॲथलेटिक्स दिनानिमित्त युवा खेळाडूंना प्रेरणेची नवी दिशा”

“जागतिक ॲथलेटिक्स दिनानिमित्त युवा खेळाडूंना प्रेरणेची नवी दिशा”

“जागतिक ॲथलेटिक्स दिनानिमित्त युवा खेळाडूंना प्रेरणेची नवी दिशा”

महा सब ज्युनियर स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फेडरेशनतर्फे खेळाडू, प्रशिक्षक व संस्थांचा गौरव

पुणे : जागतिक ॲथलेटिक्स दिनानिमित्त महा सब ज्युनियर स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फेडरेशनच्या वतीने सारसबाग येथील बाळासाहेब ठाकरे कलादालन येथे उत्कृष्ट क्रीडा खेळाडू, आदर्श क्रीडा प्रशिक्षक, आदर्श क्रीडा संघटना, उत्कृष्ट क्रीडा क्लब सन्मान तसेच कै. मोहन नारायण कोठुळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ क्रीडा शिष्यवृत्ती वितरणाचा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजू कुलकर्णी (सेक्रेटरी, पुणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना), डॉ. मदन कोठुळे (उपाध्यक्ष, इंडियन अमॅच्युअर बॉक्सिंग असोसिएशन), अनंत घरत (राज्य संघटक, महा सब ज्युनियर फेडरेशन) तसेच क्रीडा प्रशिक्षक सचिन धुरगुडे उपस्थित होते.

पाहुण्यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तसेच उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छाऐवजी फुलांच्या रोपांच्या कुंड्या देऊन पर्यावरणपूरक पद्धतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. मदन कोठुळे यांनी महा सब ज्युनियर फेडरेशनच्या माध्यमातून सब ज्युनियर खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या मदत व मार्गदर्शनाचे कौतुक करत भविष्यात क्रीडा शिष्यवृत्ती वाढविण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

अनंत घरत यांनी सांगितले की, “फेडरेशनच्या माध्यमातून सब ज्युनियर खेळाडूंना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम सुरू असून भविष्यात महाराष्ट्रातून अधिकाधिक खेळाडू ऑलिंपिक स्पर्धांमध्ये झळकावेत, हे आमचे ध्येय आहे.”

जागतिक ॲथलेटिक्स दिनाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून लहान खेळाडूंना क्रीडेसोबतच पर्यावरण संवर्धनाचाही महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

या प्रसंगी उत्कृष्ट खेळाडू म्हणून आर्य धोत्रे, समर्थ कर्वे व काव्या कोल्हटकर यांचा सन्मान करण्यात आला. आदर्श क्रीडा प्रशिक्षक म्हणून घनश्याम घोंघडे, मनाली देव व धनंजय चिंचणीकर यांना गौरविण्यात आले. तसेच फेडरेशनच्या वतीने ओजस जाधव, प्रचित सांगवे आणि शिवराज शोभणे या बाल खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.

आदर्श क्रीडा संघटना म्हणून पुणे जिल्हा ॲथलेटिक्स संघटना तर उत्कृष्ट क्रीडा क्लब म्हणून एकलव्य ॲथलेटिक्स क्लबचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन महेश चरवड यांनी केले. प्रस्तावना करताना क्रीडा संघटक अमोल घोडके यांनी लहान वयात क्रीडा प्रशिक्षणाचे मुलांच्या आरोग्य व उज्ज्वल भविष्यासाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राज्य सचिव सागर धाडवे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​कर्बलाच्या शहीदांच्या स्मरणार्थ एकतेची मिसाल: मोहरमच्या रात्री पुण्यात सरबतासाठी मोफत साखर वाटप

​पुणे, दि. २५ जून २०२६: मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना 'मोहरम'च्या नवव्या दिवशी, म्हणजेच 'कत्तलची रात्र' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रात्री, 'पंजेतन पवित्र संघटना, महाराष्ट्र राज्य' यांच्या...

मुंबई लोकल हत्या: ‘सोशल मीडिया ट्रायल’मुळे आमच्या आयुष्यावर, नोकऱ्यांवर परिणाम; असे आरोपीच्या कुटुंबीयांचे म्हणणे...

सोशल मीडिया ट्रायलमुळे आमचे जीवन आणि नोकऱ्यांवर परिणाम होत आहे, असे मुंबई लोकल ट्रेनवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीचे नातेवाईक म्हणतात मुंबई: मुंबई लोकल ट्रेनमध्ये...

सोनम रघुवंशी तुरुंगातून बाहेर आल्याने सिया गोयलने केतन अग्रवालची हत्या केली: राजाची आई. पुणे...

पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येवर इंदूरचा खून झालेला व्यापारी राजा रघुवंशी यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, सोनम रघुवंशी...

मुंबई आणि पुण्यात पाणी साचल्याने सुप्रिया यांनी भाजपवर निशाणा साधला. पुणे बातम्या

बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात सर्वत्र पाणी साचले आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. ताथवडे येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक विस्कळीत...

‘तिने प्लॅन केला, नाही त्याने माझ्यावर जबरदस्ती केली’: पुणे रिअल्टरच्या खून प्रकरणात ट्विस्ट आणि...

गहुंजे रियाल्टर केतन अग्रवाल यांच्या खून प्रकरणाला नवे वळण लागले आहे - दोन आरोपी - त्याची मंगेतर सिया गोयल (सी) आणि तिचा 'पार्टनर'...

error: Content is protected !!