Homeताज्या बातम्याआंबेगाव येथील लॉजिंगवर गुन्हे शाखेचा छापा; ४ महिलांची सुटका, एका एजंटला अटक

आंबेगाव येथील लॉजिंगवर गुन्हे शाखेचा छापा; ४ महिलांची सुटका, एका एजंटला अटक

पुणे:
पुणे शहर पोलीस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्ष (गुन्हे शाखा) यांनी पुणे-सातारा रोडवरील आंबेगाव बुद्रुक परिसरातील एका लॉजिंगवर धाड टाकून देहविक्रय व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ४ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, एका एजंटला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
​कारवाईचा तपशील
​दिनांक ११ मे २०२६ रोजी, गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की, आंबेगाव बुद्रुक येथील “द्वारका लॉजिंग अँड बोर्डिंग” येथे महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात आहे. पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तत्काळ माहितीची पडताळणी केली.
​खात्री पटल्यानंतर, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला आणि सदर लॉजवर अचानक छापा टाकला. यावेळी लॉजमध्ये आणलेल्या ०४ पीडित महिलांची यशस्वी सुटका करण्यात आली.
​आरोपीवर गुन्हा दाखल
​या प्रकरणी पोलिसांनी एका एजंटला अटक केली आहे. त्याचे नाव व पत्ता खालीलप्रमाणे आहे:
​आरोपी: सचिन बाबुराव गायकवाड (वय २८ वर्षे).
​पत्ता: पानसरे नगर, कोंढवा, पुणे (मूळ रा. मुळज, ता. उमरगा, जि. लातूर).
​सदर आरोपीविरुद्ध आंबेगाव पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३ (१) (३), ३(५) आणि अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४, ५ नुसार गु.र.नं १८८/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
​तपास पथक
​ही यशस्वी कारवाई पुणे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. विवेक मासाळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-४) श्री. विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली.
​कारवाईत सहभागी कर्मचारी:
पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उपनिरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार आंधळे, भिवरकर, केदार, कोंडे आणि महिला पोलीस अंमलदार खेडेकर व इंगळे यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘केतनने मला सांगितले की लग्न मोडण्यास उशीर झाला आहे’: पोलिसांनी म्हटले आहे की सिया...

चॅट्स सिया गोयलच्या विधानांच्या विरोधात आहेत, लोणावळा पोलिस म्हणतात लोणावळा: रियाल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे, पोलिसांनी दावा केला...

लोहगड किल्ला खून प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या वडिलांची भेट घेतली, जलदगती...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालयाचे आदेश दिले असून धक्कादायक लोहगड किल्ला हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली...

​कर्बलाच्या शहीदांच्या स्मरणार्थ एकतेची मिसाल: मोहरमच्या रात्री पुण्यात सरबतासाठी मोफत साखर वाटप

​पुणे, दि. २५ जून २०२६: मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना 'मोहरम'च्या नवव्या दिवशी, म्हणजेच 'कत्तलची रात्र' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रात्री, 'पंजेतन पवित्र संघटना, महाराष्ट्र राज्य' यांच्या...

मुंबई लोकल हत्या: ‘सोशल मीडिया ट्रायल’मुळे आमच्या आयुष्यावर, नोकऱ्यांवर परिणाम; असे आरोपीच्या कुटुंबीयांचे म्हणणे...

सोशल मीडिया ट्रायलमुळे आमचे जीवन आणि नोकऱ्यांवर परिणाम होत आहे, असे मुंबई लोकल ट्रेनवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीचे नातेवाईक म्हणतात मुंबई: मुंबई लोकल ट्रेनमध्ये...

सोनम रघुवंशी तुरुंगातून बाहेर आल्याने सिया गोयलने केतन अग्रवालची हत्या केली: राजाची आई. पुणे...

पुणे : पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येवर इंदूरचा खून झालेला व्यापारी राजा रघुवंशी यांच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, सोनम रघुवंशी...

error: Content is protected !!