Homeताज्या बातम्याNO PARKING” फलकाला केराची टोपली! PMPML कार्यालयाबाहेर नियमांची उघड उडवणूकपुणे महानगर परिवहन...

NO PARKING” फलकाला केराची टोपली! PMPML कार्यालयाबाहेर नियमांची उघड उडवणूकपुणे महानगर परिवहन महामंडळ कार्यालयाबाहेर बेकायदेशीर दुचाकी पार्किंग

“NO PARKING” फलकाला केराची टोपली! PMPML कार्यालयाबाहेर नियमांची उघड उडवणूकपुणे महानगर परिवहन महामंडळ कार्यालयाबाहेर बेकायदेशीर दुचाकी पार्किंग

पुणे | प्रतिनिधी
पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) मुख्य कार्यालय परिसरातच वाहतूक नियमांची खुलेआम पायमल्ली होत असल्याचे चित्र समोर आले आहे. कार्यालयाबाहेर स्पष्टपणे “NO PARKING – येथे वाहन उभे करू नये (२०० मीटर)” असा फलक लावलेला असतानाही मोठ्या प्रमाणावर दुचाकी वाहने रस्त्यावर व पदपथावर बेकायदेशीररीत्या उभी करण्यात आली आहेत.
छायाचित्रांत स्पष्टपणे दिसून येते की, कार्यालयाच्या प्रवेशद्वारालगत तसेच पदपथावर रांगेत दुचाकी पार्क केल्या असून त्यामुळे पादचाऱ्यांना चालणे अवघड झाले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व्यक्तींना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
महत्वाचे म्हणजे, वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेच्या कार्यालयासमोरच नियम मोडले जात असतील, तर सामान्य नागरिकांनी नियम पाळावेत अशी अपेक्षा कशी करावी, असा सवाल उपस्थित होत आहे.
स्थानिक नागरिक व प्रवाशांमध्ये याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून,
👉 या बेकायदेशीर पार्किंगला जबाबदार कोण?
👉 वाहतूक पोलिस व PMPML प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे?
👉 “NO PARKING” फलक केवळ दिखाव्यासाठी आहे का?
असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
नागरिकांची मागणी आहे की,
संबंधित परिसरात तत्काळ टोइंग कारवाई करण्यात यावी
नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई व्हावी
कार्यालय परिसरात शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था निर्माण करावी
अन्यथा, नियम तोडणाऱ्यांना मोकळीक देणारे प्रशासन हे स्वतःच नियमभंगाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप अधिक बळावेल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील सर्वात जास्त पूरप्रवण परिसर, एकतानगरी, या वेळी धरणातून २७,००० क्युसेकने विसर्ग केल्यानंतर पुन्हा...

बुधवारी (8 जुलै) एकतानगरीत बचावकार्य सुरू होते. छायाचित्र श्याम सोनार पुणे : शेवटच्या वेळी एकतानगरीतील रहिवाशांना 2024 मध्ये गंभीर पुराचा इशारा देण्यात आला...

जुलैच्या पहिल्या आठ दिवसांत पुण्याने 57 वर्षांचा पावसाचा विक्रम मोडला. पुणे बातम्या

पुण्यातील खडकवासला धरणाजवळ लोकांनी पावसाचा आनंद लुटला. फोटो आदित्य वायकुळ पुणे : 1 जुलै ते 8 जुलै दरम्यान, पुण्यात 57 वर्षातील महिन्याची सर्वात...

मोशीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे गुहा बांधल्याने सात अजूनही अडकले | पुणे बातम्या

अधिका-यांनी सांगितले की, रविवारपासून या भागात झालेल्या मुसळधार आणि अविरत पावसामुळे PCMC च्या वेस्ट-टू-एनर्जी प्लांट इमारतीवर कोसळलेला कचऱ्याचा मोठा ढिगारा खाली पडला असावा....

पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; पाणी साचले, वाहतूक कोंडी शहर ठप्प; पूरग्रस्त भागातून ४९२ कुटुंबांचे...

मुसळधार पावसामुळे पुण्यात पाणी साचले आणि वाहतूक विस्कळीत झाली. पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) मान्सूनपूर्व तयारीमधील उणिवा उघड करत, मोठ्या प्रमाणावर पाणी साचणे, वाहतूक...

बीएलओ ड्युटीवरून महा शिक्षकांनी आज राज्यव्यापी शाळा बंद. पुणे बातम्या

शिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोड होऊ नये म्हणून शिक्षकांनी केवळ शैक्षणिक जबाबदाऱ्या सोपवल्या पाहिजेत, अशी संघटनांची इच्छा आहे. पुणे : प्राथमिक शिक्षकांना बूथ-लेव्हल ऑफिसर (बीएलओ)...

error: Content is protected !!