PMC च्या आदेशाला ठेकेदारांकडून धुडकाव – कनिष्ठ अभियंता संदीप दीपक यांच्यावर आश्वासनगिरीचा आरोप
पुणे (दि. ७ जून २०२५): पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात मोठा गोंधळ उघडकीस आला आहे. तक्रारदार अमीर मोहमद शेख यांनी पुणे महानगरपालिका’ grievances portal वर नोंदवलेल्या तक्रारीनुसार, PMC ने थांबवण्याचे स्पष्ट आदेश दिलेल्या कामावर संबंधित ठेकेदारांकडून बेकायदेशीररीत्या काम सुरु ठेवले गेले.
या प्रकरणात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, कनिष्ठ अभियंता (JR. Engineer) संदीप दीपक यांनी तक्रारदार आणि ठेकेदार यांना वेगवेगळी आश्वासने देत भ्रम निर्माण केला. एका बाजूला काम थांबवण्याचे आदेश असल्याचे सांगितले गेले, तर दुसऱ्या बाजूला ठेकेदारास अनधिकृतरीत्या काम करण्याची मुभा देण्यात आल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, संबंधित काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून नागरिकांच्या पैशांचा सर्रास अपव्यय केला जात आहे. याप्रकरणी PMC अधिकारी दुर्लक्ष करत आहेत, तर काही अधिकारी दबाव आणत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
तक्रार क्रमांक: DEP/PWOD/PUNE/2025/88
तक्रार दिनांक: ७ जून २०२५
तक्रारदार: अमीर मोहमद शेख
मुख्य मागण्या:
1. कनिष्ठ अभियंता संदीप दीपक यांच्यावर विभागीय चौकशी होऊन निलंबनाची कारवाई करण्यात यावी.
2. संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
3. PMC अधिकारी व ठेकेदारांची साठगाठ तपासून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.
🛑 PMC च्या भ्रष्ट आणि विस्कळीत कारभाराविरोधात ठोस पावले उचलली जाणार का?

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























