Homeताज्या बातम्याऑपरेशन “फ्लश आऊट” अंतर्गत सिंहगड रोड पोलिसांची कारवाई — धारदार शस्त्रांसह आरोपी...

ऑपरेशन “फ्लश आऊट” अंतर्गत सिंहगड रोड पोलिसांची कारवाई — धारदार शस्त्रांसह आरोपी अटकेत

पुणे, दि. १६ एप्रिल २०२६ — पुणे शहर पोलीसांकडून सुरू असलेल्या “ऑपरेशन फ्लश आऊट” मोहिमेअंतर्गत सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत धारदार शस्त्रांसह एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
दि. १६/०४/२०२६ रोजी गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग दरम्यान तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, तसेच पोलीस अंमलदार विकास बांदल, संदीप कांबळे, तानाजी सागर, सागर शेडगे हे हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार तानाजी सागर व संदीप कांबळे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वडगाव बुद्रुक येथील धोंडीबा निवास बिल्डिंग परिसरात एक संशयित इसम पांढऱ्या रंगाच्या पिशवीत लोखंडी हत्यार घेऊन उभा आहे.
सदर माहिती तात्काळ पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांना कळविण्यात आली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देत खात्री करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश प्राप्त केले. त्यानुसार पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, एक इसम बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये संशयास्पद स्थितीत उभा असल्याचे दिसून आले.
पोलिसांना पाहताच त्या इसमाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परतेने त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव संकेत बालाजी गायकवाड (वय २७ वर्षे, रा. पीएमसी शाळेमागे, गोसावी वस्ती, वडगाव बुद्रुक, पुणे) असे सांगितले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून अंदाजे ८०० रुपये किंमतीचा लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. त्यानंतर करण्यात आलेल्या घरझडतीत आरोपीकडून एक लोखंडी धारदार हत्यार व एक लोखंडी तलवार देखील हस्तगत करण्यात आली.
या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९५४/२०२६ नोंदविण्यात आला असून, आरोपीविरुद्ध आर्म्स अॅक्ट कलम ४(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार विकास बांदल करीत आहेत.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपआयुक्त (परिमंडळ-३) श्री. संभाजी कदम, तसेच मा. सहायक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग श्री. अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर व पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. समीर गायकवाड यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.
या उल्लेखनीय कारवाईमध्ये
पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर,
पोलीस अंमलदार उत्तम तारू, आण्णा केकाण, विकास बांदल, सतीश मोरे, राहुल ओलेकर, सागर शेडगे, तानाजी सागर, संदीप कांबळे, समीर माळवदकर, विनायक मोहिते व शिरीष गावडे
यांच्या पथकाने सक्रिय सहभाग घेतला.
पुणे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत अशा धडक कारवाया सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

‘क्रिकेट मॅचमध्ये गोयल कुटुंबीयांना चेतन चौधरीबद्दल कळले, मग ‘श्रीमंत’ केतन अग्रवालसोबत सियाचे लग्न लावले...

केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये केतनचे शेवटचे क्षण टिपले आहेत. पुणे: सहआरोपी चेतन चौधरीसोबतचे नातेसंबंध समजल्यानंतर आणि...

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: काळेपडळमधून सुगंधी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त, आरोपीला ठोकल्या...

पुणे, दिनांक २६ जून २०२६: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी गुटखा, सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ पोलीस...

error: Content is protected !!