पुणे:
ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वस्तू विक्रीच्या जाहिरातीचा फायदा घेऊन फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांचे प्रमाण वाढत असतानाच, विमानतळ पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक करण्यात यश मिळवले आहे. ‘ओएलएक्स’वर (OLX) टाकलेली दुचाकी विक्रीची जाहिरात पाहून टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने गाडी चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
या प्रकरणातील फिर्यादी यांनी आपली रॉयल इनफिल्ड मेटॉर ३५० ही दुचाकी विक्रीसाठी ‘ओएलएक्स’वर पोस्ट केली होती. १० मार्च २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता इशिता माथुर नावाच्या एका अकाऊंटवरून फिर्यादींना संपर्क करण्यात आला आणि गाडी खरेदीत रस असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर एक इसम गाडी पाहण्यासाठी आला आणि फिर्यादींकडून टेस्ट ड्राईव्ह घेण्याच्या बहाण्याने दुचाकी घेऊन पसार झाला. याप्रकरणी १४ मार्च २०२६ रोजी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०३ (२) नुसार गुन्हा (रजिस्टर नंबर १५२/२०२६) दाखल करण्यात आला होता.
असा लागला छडा
गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार जोगदंडे यांनी ओएलएक्स अकाऊंटची माहिती मिळवली. त्यास लिंक असलेल्या मोबाईल नंबरचे सीडीआर (CDR) प्राप्त करून त्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तसेच, घटनास्थळापासून तब्बल २० किलोमीटर पर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.
आरोपीला अटक आणि मुद्देमाल जप्त
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहम्मद मुजबता इकबाल शेख (वय २७ वर्षे, रा. खडी मशीन चौक, पिसोळी रोड, कोंढवा, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून फिर्यादींची १ लाख रुपये किमतीची स्टैलर ब्लॅक रंगाची रॉयल इनफिल्ड मेटॉर ३५० (वाहन क्रमांक: एम एच १२ यु झेड ८०१८) हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार प्रशांत माटे करत आहेत.
या पथकाने केली कारवाई
सदर कारवाई अपर पोलीस आयुक्त (पुर्व प्रादेशिक विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उपायुक्त (परि ०४) श्री. सोमय मुंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (लोणीकंद विभाग) श्रीमती नुतन पवार यांच्या आदेशान्वये करण्यात आली.
विमानतळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार प्रशांत माटे, लालु कहे, अंकुश जोगदंडे व हरी पुंडे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























