पुणे : जमिनीच्या वादातून तरुणाचा निर्घण खुन करुन पसार झालेल्या चौघांना आंबेगाव पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथून २४ तासांच्या आत जेरबंद केले.अमर दिलीप साकोरे (वय ४०, रा. संतोषनगर, कात्रज), मंदार मारुती किवळे (वय ३५, रा. नवीन वसाहत, कात्रज), गिरीष सुभाष वावरे (वय २६, रा. संतोषनगर, कात्रज) आणि योगेश बाबुराव डोरे (वय ३५, रा. खोपडेनगर, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शुभम सुभाष चव्हाण (वय २८, रा कात्रज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.याबाबत अमोल रामचंद्र चव्हाण (वय ४६, रा. गणेश पार्क, संतोषनगर, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास संतोषनगरमध्ये घडली होती.कात्रज येथील शुभम चव्हाण याच्या घराशेजारील जमिनीवरुन शुभम चव्हाण आणि अमर साकोरे यांच्यात वाद होता. त्यातूनच चौघा जणांनी लाकडी बांबु, स्टंपने शुभम चव्हाण याला मारहाण करुन त्याचा खुन केला. शुभम चव्हाण याचा खुन केल्यानंतर आरोपी पळून गेले होते. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलिसांनी सहा पथके शोध घेत होते पोलिसांनी आरोपी निष्पन्न करुन तांत्रिक विश्लेषणाद्वारे ते मोहोळ तालुक्यातील कामती येथे असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर व पोलीस अंमलदार हणमंत मासाळ, धनाजी धोत्रे, नितीन कातुर्डे हे मोहोळ येथे गेले. तेथे तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेतल्यावर ते मंगळवेढा ते सोलापूर महामार्गावरील समाधान हॉटेल समोर पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक स्वाती देवधर तपास करीत आहेत.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























