पुणे | प्रतिनिधी
पुणे शहरातील चंदननगर परिसरात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा उलगडा करत खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलिसांनी अवघ्या ०६ तासांत आरोपींना जेरबंद केले आहे.
या प्रकरणातील फिर्यादीच्या पत्नी पुनम दिनेश मुन हिचे अॅड. संजय सावंत यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या संशयातून स्वाती संजय सावंत, तिची मुलगी आणि अॅड. संजय दत्तात्रय सावंत यांनी संगनमताने कट रचल्याचे तपासात समोर आले आहे.
दि. १६/०४/२०२६ रोजी दुपारी १४:०० ते दि. १७/०४/२०२६ रोजी सकाळी ११:०० या कालावधीत अॅड. संजय सावंत यांच्या जुन्या मुंढवा रोड, संदीप हॉटेलजवळील चंदननगर येथील कार्यालयात पुनम मुन हिला दोरीने हात-पाय बांधून, डोक्यात व तोंडावर बॅंडेज बांधून तसेच धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला.
या प्रकरणी चंदननगर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ९६/२०२६ भा.दं.सं. ३०२(१), ३४ तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध (सुधारणा) अधिनियम २०१५ चे कलम ३(२)(va) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे आरोपी अॅड. संजय सावंत (वय ४३, रा. आनंदपार्क, वडगाव शेरी, पुणे) व त्याची पत्नी स्वाती संजय सावंत (वय ४३, रा. आनंदपार्क, वडगाव शेरी, पुणे) यांना ताब्यात घेतले. पुढील चौकशीत गुन्ह्यातील इतर सहभागही स्पष्ट झाला.
या प्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी करत आरोपींना अवघ्या ०६ तासांत अटक केली.
सदर कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४, पुणे शहर सोमय मुंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त, खराडी विभाग, पुणे शहर प्रांजली सोनवणे, मा. सहायक पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग नूतन पवार, मा. सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा-२, पुणे शहर राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख, चंदननगर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, तसेच खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार अमोल घावते, कुशलाकर, गणेश खरात, सुरेश जगदाळे, दिलीप गोरे, प्रशांत शिंदे, प्रवीण भोसले, कानिफनाथ कारखिले यांनी ही यशस्वी कारवाई केली.
या जलद कारवाईमुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा होऊन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























